मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

कोरोनाच्या भीतीने धोनीने सोडली चेन्नई सुपर किंग्जची साथ, CSKने शेअर केला VIDEO

कोरोनाच्या भीतीने धोनीने सोडली चेन्नई सुपर किंग्जची साथ, CSKने शेअर केला VIDEO

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं भारताला दोन वर्ल्ड कप जिंकून दिले आहेत. मात्र वर्ल्ड कप 2019नंतर धोनीनं एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. त्यामुळं धोनी निवृत्ती घेणार का?, असा प्रश्न चाहत्यांमध्ये आहे.

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं भारताला दोन वर्ल्ड कप जिंकून दिले आहेत. मात्र वर्ल्ड कप 2019नंतर धोनीनं एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. त्यामुळं धोनी निवृत्ती घेणार का?, असा प्रश्न चाहत्यांमध्ये आहे.

कोरोनामुळे सर्व संघांनी आपले सरावही रद्द केले आहेत. त्यामुळं भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीनेही चेन्नईची साथ सोडली आहे.

  • Published by:  Priyanka Gawde

रांची, 15 मार्च : भारतात कोरोना व्हायरसची (Coronavirus) भीती दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे देशातील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. कोरोनाचा परिणाम भारताच्या सर्वात मोठ्या क्रिकेट लीगवरही झाला आहे. बीसीसीआयने आयपीएलचा तेराव हंगाम पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं 29 मार्चपासून सुरू होणारा हंगाम आता 15 एप्रिलपासून सुरू होणार आहे. कोरोनामुळे सर्व संघांनी आपले सरावही रद्द केले आहेत. त्यामुळं भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीनेही चेन्नईची साथ सोडली आहे.

धोनी गेले कित्येक महिने क्रिकेटपासून दूर असल्यामुळे आयपीेएलआधी चेन्नईत आपल्या संघासोबत सराव करत होता. मात्र कोरोनामुळे हे सरावसत्र रद्द करण्यात आले, त्यामुळे धोनीही रांचीत आपल्या घरी पोहचला आहे.

वाचा-IPL बाबत सौरव गांगुलीने केली मोठी घोषणा, कोरोनोच्या दहशतीचा असा होणार परिणाम

सोशल मीडियावर चेन्नई सुपर किंग्ज संघाने धोनीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात धोनी त्याच्या चाहत्यांना भेटताना दिसत आहे. तर, काही चाहत्यांना धोनीने ऑटोग्राफही दिला. या व्हिडीओला चेन्नई संघाने, “चेन्नई हेच तुमचे घर झाले आहे सर. तुम्हाला प्रेमाचा निरोप”, असे कॅप्शन दिले आहे.

वाचा-कोरोनाचा IPLला दणका! एका झटक्यात मुंबई इंडियन्सला बसणार हजारो कोटींचा फटका

वाचा-कोरोनाचा हाहाकार! दिग्गज खेळाडूंना लागण, एकाचा उपचारादरम्यान मृत्यू

याआधी बीसीसीआयने आयपीएलमधल्या संघांच्या मालकांसोबत चर्चा करत हंगाम पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र असे असले तरी, कोरोनाची दाहकता पाहता आयपीएलचा हा हंगाम रद्दही केला जाऊ शकतो. सध्या सुरक्षेच्या कारणामुळे काही काळ आयपीएलवर स्थगिती आणली आहे. दुसरीकडे धोनी रांचीमध्ये पोहचल्यामुळे चाहत्यांनी अनेक तर्क वितर्क लावण्यास सुरुवात केली आहे.

वर्ल्ड कप 2019नंतर धोनीने एकही क्रिकेट सामना खेळलेला नाही. त्यामुळं आयपीएलमध्ये कमबॅक करण्यासाठी धोनी सज्ज होता. मात्र आयपीएल रद्द झाल्यास, धोनी चाहत्यांना मोठा धक्का बसू शकतो.

First published:

Tags: Cricket, Dhoni, IPL 2020