धोनीला शेअर केला गल्ली क्रिकेटचा अनुभव, VIDEO VIRAL

धोनीनं शेअर केलेला हा मजेशीर व्हिडिओ पाहून तुम्हालाही तुमच्या बालपणाच्या आठवणी ताजा होतील.

News18 Lokmat | Updated On: Sep 25, 2019 08:40 AM IST

धोनीला शेअर केला गल्ली क्रिकेटचा अनुभव, VIDEO VIRAL

रांची, 24 सप्टेंबर : भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि स्टार खेळाडू महेंद्रसिंग धोनी दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर आपल्या घरी परतला. धोनी तब्बल दोन महिने क्रिकेटपासून लांब आहे. त्यानं शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना वर्ल्ड कप 2019मध्ये न्यूझीलंड विरोधात खेळला होता. त्यानंतर धोनी वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गैरहजर राहिला. त्यामुळं धोनी निवृत्ती घेणार का, अशा चर्चा जोर धरत आहेत. मात्र धोनीनं अद्याप याबाबत काही अधिकृत माहिती दिलेली नाही.

दरम्यान धोनीनं इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये धोनीनं गल्ली क्रिकेटच्या आपल्या आठवणी शेअर केल्या आहेत. या व्हिडिओमध्ये धोनीच्या मित्रानं फलंदाज करत असताना गोलंदाजानं बाद करूनही त्यानं मैदान सोडले नाही. एवढेच नाही तर सलग दुसऱ्या चेंडूवर धोनी बाद झाला. हा मजेदार व्हिडिओ धोनीनं आपल्या शालेय दिवसातील आठवण म्हणून नाही तर चाहत्यांना आपल्या गल्ली क्रिकेटची आठवण करून दिली. त्याचबरोबर धोनीनं, “प्रत्येकानं आपल्या आयुष्यात कधी ना कधी असे क्रिकेट खेळायला हवे, खासकर शाळेतल्या दिवसांमध्ये”, असे कॅप्शन दिले आहे.

तुम्हीही अनुभवला असेल असा प्रसंग

धोनीनं शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, “जेव्हा तुम्हाला माहित असते की काय होणार आहे आणि तुम्ही कॅमेरा ऑन करता तेव्हा पुढच्या काही सेकंदात तुम्हाला तेच मिळते. हा व्हिडिओ तेवढा चांगला नसला तरी, या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय होत आहे ते कळेलचं. आपण क्रिकेटमध्ये कधी ना कधी हे पाहिलेच असेल.

Loading...

आता थेट पुढच्या वर्षी धोनी करणार पुनरागमन?

धोनीनं क्रिकेटमधून विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे. याचा अर्थ धोनी दोन दिवसांत सुरू होणाऱ्या विजय हजारे करंडक स्पर्धेतही खेळू शकणार नाही आहे. नोव्हेंबरपर्यंत क्रिकेट खेळणार नसल्यामुळं धोनी आता थेट पुढच्या वर्षी वेस्ट इंडिजचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे, त्यावेळी पुनरागमन करू शकतो. तसेही झाले नाही तर चाहत्यांना झिम्बाम्वे आणि ऑस्ट्रेलिया विरोधात होणाऱ्या मालिकांपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

वर्ल्ड कपमध्ये खेळणार का धोनी?

धोनीनं अखेरचा टी-20 सामना ऑस्ट्रेलियाविरोधात खेळला होता. त्यानंतर धोनीनं एकही टी-20 सामना खेळलेला नाही. त्यामुळं टी-20 वर्ल्ड कपच्या दृष्टीनं विचार केल्यास धोनीची जागा ऋषभ पंत घेऊ शकतो. पण पंतची खेळी पाहता, टीम इंडियाला धोनीसारख्या अनुभवी खेळाडूची गरज भासेल.

आयपीएलचा पुढचा हंगाम खेळणार धोनी

आयपीएलमधील संघ चेन्नई सुपरकिंग्जचे मालक एन. श्रीनिवासन यांनी महेंद्रसिंग धोनीच्या आयपीएलमध्ये खेळण्याबाबत मोठे विधान केले आहे. धोनीनं कर्णधार म्हणून चेन्नई सुपरकिंग्ज संघाला तीन वेळा विजेतेपद मिळवून दिले. त्यामुळं येत्या आयपीएल हंगामात धोनी खेळणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या सगळ्या प्रकरणावर सीएसकेचे मालक श्रीनिवासन यांनी मोठा खुलासा केला आहे. श्रीनिवासन यांनी धोनीच पुढच्या हंगामात कर्णधार असल्याचे स्पष्ट केले आहे. टाईम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत धोनी आयपीएलच्या हा हंगाम खेळणार असल्याचे सांगितले.

VIDEO : वंचितशी 'तलाक' घेणाऱ्या जलील यांना आली जाग, आता म्हणतात...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 25, 2019 08:40 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...