धोनीबद्दल मोठी बातमी! वेस्ट इंडीज दौऱ्यातून घेतली माघार

धोनीने आपण वेस्ट इंडीज दौऱ्यावर जाण्यासाठी उपलब्ध नसल्याचं बीसीसीआयला सांगितलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 20, 2019 02:38 PM IST

धोनीबद्दल मोठी बातमी! वेस्ट इंडीज दौऱ्यातून घेतली माघार

नवी दिल्ली, 20 जुलै : ICC Cricket World Cup 2019 सेमीफायनलमध्ये भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला. त्यानंतर आता भारतीय संघ वेस्ट इंडीज दौऱ्यावर जाणार आहे. दरम्यानच्या काळात भारताचा यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनी निवृत्ती घेणार अशी चर्चा सुरू होती. आता धोनी वेस्ट इंडीज दौऱ्यावर जाणार नसल्याची माहिती बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पीटीआयला दिली आहे. त्याच्या निवृत्तीची चर्चा होत असली तरी तो पुढच्या वर्षी आयपीएल खेळून निवृत्ती जाहीर करू शकतो असंही म्हटलं जात आहे.

बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पीटीआयला सांगितलं आहे की, धोनीने स्वत: वेस्ट इंडीज दौऱ्यावर उपलब्ध नसल्याचं सांगितलं आहे. तो दोन महिने पॅरामिलिट्री रेजिमेंटसोबत राहणार आहे.

वेस्ट इंडीज दौऱ्यावर धोनी जाणान नाही तर कर्णधार विराट कोहली आणि बुमराह यांनाही विश्रांती दिली जाऊ शकते. दरम्यान आता धोनी दोन महिन्यांसाठी सियाचीनमध्ये भारतीय लष्कारासोबत जाऊ शकतो. धोनीला 2011मध्ये लेफ्टनंट कर्नलची पदवी देण्यात आली होती.

वेस्ट इंडीज दौऱ्यावर धोनी संघात नसेल. तो यापासून दूर राहणार असला तरी संघात होणाऱ्या बदलासाठी तो मदत करणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार धोनी वेस्ट इंडीजला जाणार नाही. भारताच्या संघात धोनी 15 जणांमध्ये असेल पण तो अंतिम अकरामध्ये नसेल. त्याच्या जागी ऋषभ पंत यष्टीरक्षक म्हणून संघात खेळण्याची शक्यता आहे.

धोनीच्या जवळच्या मित्रांनी काही वृत्तसंस्थांना दिलेल्या माहितीनुसार, धोनी निवृत्तीनंतर काय करणार हे निश्चित नाही आहे. त्यामुळं तो लष्करातही सामिल होऊ शकतो. त्यामुळं जर धोनी वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार नसेल तर, तो सियाचीनमध्ये दोन महिन्यांसाठी बदली घेऊ शकतो.

Loading...

पंत-शंकरची जागा कोणी घ्यायला हवी? मांजरेकरांनी सुचवला पर्याय

सचिनप्रमाणेच धोनीने करायला हवं, माजी निवड समिती सदस्यांचा सल्ला

काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांचा हॉस्पिटलमध्ये राडा; पोलिसांवर भडकल्या, पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 20, 2019 02:28 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...