चक्क कूल धोनी म्हणाला, एकवेळ माझ्या हातून हत्या होईल पण....

चक्क कूल धोनी म्हणाला, एकवेळ माझ्या हातून हत्या होईल पण....

'रोर ऑफ द लायन' ही डॉक्युमेंटरी लवकरच प्रदर्शित होणार

  • Share this:

मुंबई, 11 मार्च : भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीच्या चाहत्यांची संख्या कमी नाही. तो एकमेव असा कर्णधार आहे ज्याने भारताला दोन्ही विश्वचषक जिंकून दिले आणि कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्या स्थानावर पोहचवले. आयपीएलमध्येही त्याने चेन्नई सुपर किंग्जला तीनवेळा विजेतेपद मिळवून दिलं आहे. त्याच्याच कारकिर्दीत चेन्नईला स्पॉट फिक्सिंगच्या आरोपाला सामोरं जावं लागलं. चेन्नईवर दोन वर्षांची बंदीही घालण्यात आली होती.

कॅप्टन कूल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धोनीने मॅच फिक्सिंगवर अनेकदा मौन बाळगलं आहे. आता त्याने पहिल्यांदाच उघडपणे प्रतिक्रिया दिली आहे. 'रोर ऑफ द लायन' ही डॉक्युमेंटरी लवकरच प्रदर्शित होणार आहे. यात धोनीने खून करणे हा सर्वात मोठा गुन्हा नाही तर मॅच फिक्सिंग करणे हा गुन्हा मोठा असल्याचे म्हटले आहे.

डॉक्युमेंटरीच्या 45 सेकंदाच्या ट्रेलरमध्ये धोनी म्हणाला की, एखाद्यावेळी मी खून करेन पण स्पॉट फिक्सिंग करणार नाही. आमचा संघ मॅच फिक्सिंमध्ये अडकला होता. यावेळी माझ्यावरही आरोप करण्यात आला. आमच्यासाठी तो काळ सर्वात कठिण होता. दोन वर्षांची बंदी उठवल्यानंतर पुनरागमन केल्याचा क्षण भावनिक होता. ज्या गोष्टीमुळे आपला मृत्यू होत नाही ती गोष्ट आपल्याला मजबूत करते असंही धोनी म्हणाला आहे.

आयपीएलच्या 2013 च्या हंगामात चेन्नईवर स्पॉट फिक्सिंगचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर चेन्नईला दोन वर्षांच्या बंदीचा सामना करावा लागला. बंदीनंतर 2018 मध्ये चेन्नईने विजेतेपद पटकावून आयपीएलमध्ये जोरदार पुनरागमन केले होते. चेन्नईशिवाय राजस्थान रॉयल्सवरही स्पॉट फिक्सिंगचा आरोप करण्यात आला होता.

वाचा : धोनीच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी, आता भारतात दिसणार नाही माहीचे मॅजिक?

37 वर्षीय महेंद्रसिंग धोनीने 15 वर्षांच्या क्रिकेटमध्ये करिअरमध्ये 341 एकदिवसीय, 90 कसोटी, 98 टी 20 सामने खेळले आहेत. तो जगातील एकमेव यष्टीरक्षक कर्णधार आहे ज्याने संघाला विश्वचषक जिंकून दिला आहे. धोनीने 2015 च्या विश्वचषकापूर्वी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यानंतर तो फक्त एकदिवसीय आणि टी 20 मध्ये खेळतो.

वाचा : 'विराट'सेनेची देशभक्ती पाकला झोंबली, आयसीसीकडे करणार तक्रार

First published: March 11, 2019, 9:38 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading