कॅप्टन कुलला राग येतो तेव्हा...,धोनीनं स्वत: सांगितला किस्सा

कॅप्टन कुलला राग येतो तेव्हा...,धोनीनं स्वत: सांगितला किस्सा

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी कॅप्टन कुल या नावनं ओळखला जातो.

  • Share this:

नवी दिल्ली, 16 ऑक्टोबर : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी कॅप्टन कुल या नावनं ओळखला जातो. मैदानात फार कमी वेळा धोनी आपला राग व्यक्त करतो, त्यामुळं त्याला कोणीच कधी त्रागा करताना पाहिले नाही आहे. मात्र भारताला दोन वेळा वर्ल्ड चॅम्पियन करणाऱ्या धोनीनं स्वत: कबुल केले की त्याला राग येतो.

नुकत्याच झालेल्या एका कायर्क्रमात धोनीनं राग येतो असे कबुल करत, “मी सामन्य मनुष्य आहे. त्यामुळं मला राग येणे स्वाभाविक आहे. पण मी उगाच रागराग करत नाही मी माझ्या भावनांवर नियंत्रण ठेवतो”, असे सांगितले. जुलैमध्ये वर्ल्ड कप 2019मध्ये सेमीफायनल सामन्यात भारताला न्यूझीलंडकडून पराभव सहन करावा लागला. त्यानंतर धोनीनं आतापर्यंत एकही सामना खेळलेला नाही. धोनी सध्या क्रिकेटपासून लांब असून टी-20 वर्ल्ड कपआधी संघात सामिल होईल, अशी अपेक्षा आहे.

वाचा-विराटचा पत्ता लवकरच होणार कट? ‘या’ कारणामुळे रोहित होऊ शकतो नवा कर्णधार

दरम्यान, धोनीनं परिस्थितीशी सामना कसा करतो असे विचारल्यास, “सगळ्यांप्रमाणे मी पण निराश होतो, मला बऱ्याच वेळा प्रचंड राग येतो. पण महत्त्वाचे हे आहे की कोणतीही भावना ही रचनात्मत नसते”, असे सांगितले. तसेच, “कधी कसे व्यक्त झाले पाहिजे हे प्रत्येक व्यक्तिवर असते. मी पुढे काय करू शकतो? कोणतत्या योजना करू शकतो? या सगळ्याचा विचार केल्यानंतर माझा राग कमी होत गेला, मी काय करू शकतो यावर जास्त भर देऊ लागलो”, असे मत व्यक्त केले.

वाचा-संघाबाहेर असलेला हार्दिक पांड्या भावुक, 3 वर्षांपूर्वीच्या आठवणींना दिला उजाळा

कर्णधार असताना या गोष्टींकडे असते धोनीचे लक्ष

यावेळी धोनीनं कर्णधार असताना, “जर कसोटी मॅच आहे तर त्यात दोन डाव असतात. त्यामुळं रणनीती तयार करण्यासाठी थोडा वेळ मिळतो. टी-20मध्ये सगळं पटापट होत असते. त्यामुळं तुम्हाला निर्णयही तसेच, घ्यावे लागतात”, या गोष्टी महत्त्वाच्या असतात असे सांगितले. तसेच, “पराभव हा संघाचा असतो, त्यासाठी कोणत्याही एका खेळाडूला जबाबदार ठरवणे चुकीचे आहे. पराभवाचा अर्थ संघ आपली रणनीती योग्य प्रकारे मैदानात उतरवू शकला नाही”, असे सांगत आपल्या कर्णधार पदाच्या आठवणींना उजाळा दिला.

वाचा-टी-20 वर्ल्ड कपआधी होणार भारत-पाक सामना, असा आहे ICCचा प्लॅन

कशी तयार होते करवंटीपासून आकर्षक पणती? पाहा VIDEO

Published by: Priyanka Gawde
First published: October 16, 2019, 6:31 PM IST
Tags: MS Dhoni

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading