माहीची धुम स्टाईल! 35 लाखांच्या Kawasaki H2 बाईकवरून राईडवर निघाला धोनी, पाहा VIDEO

माहीची धुम स्टाईल! 35 लाखांच्या Kawasaki H2 बाईकवरून राईडवर निघाला धोनी, पाहा VIDEO

दोन महिन्यांनंतर घरी पोहचलेला धोनी सध्या आपल्या आवडत्या गाड्यांसोबत वेळ घालवत आहे.

  • Share this:

रांची, 27 सप्टेंबर : भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी क्रिकेटपासून लांब आहे. वर्ल्ड कपनंतर धोनी विश्रांती घेत आहे, त्यामुळं वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका दौऱ्यात त्याला संधी मिळाली नाही. या कालावधीत धोनीनं लष्करात भारतीय सैन्याचे ट्रेनिंग घेतले. धोनी जवळ जवळ एक महिना लष्करात ट्रेनिंग घेतली.

लेफ्टनंट कर्नल मानद असलेल्या धोनीनं जम्मू-काश्मीरमध्ये आपले ट्रेनिंग पूर्ण करत 15 दिवस कामही केले. त्यानंतर धोनीनं आपले अपूर्ण काम पूर्ण केले. त्यानंतर धोनी अमेरिकेला रवाना झाला होता. त्यामुळं तब्बल दोन महिने क्रिकेटपासून आणि घरापासून लांब असलेला धोनी अखेर दोन महिन्यांनंतर रांचीमध्ये पोहचला. घरी पोहचल्यानंतर धोनी सध्या आपल्या आवडत्या गाड्यांसोबत वेळ घालवत आहे. याआधी धोनी आपली नवी कोरी Jeep Grand Cherokee Trackhawkमध्ये सैर करताना दिसला. त्यानंतर धोनी आपली आवडती Kawasaki H2 बाईक चालवताना दिसला.

वाचा-दोन महिन्यांनंतर घरी परतला धोनी, 'या' नव्या पाहुण्यासोबत घालवला वेळ!

धोनीनं 2015मध्ये Kawasaki H2 बाईक खरेदी केली होती, त्यावेळी पहिल्यांदाच ही बाईक भारतात लॉंच करण्यात आली होती. त्यावेळी या गाडीची किंमत होती 29 लाख रुपये, त्यावेळी धोनीनं त्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. दरम्यान आता धोनीचा ताजा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. Kawasaki H2 ही फास्टेस्ट रोड लीगल बाईकपैकी एक आहे. यात सुपरचार्जर बुस्ट पॉवर वापरण्यात आली आहे. या बाईक कंपनीनं 998cc क्षमतेच्या लिक्विड कुल्ड इंजिनाचा वापर करण्यात आला आहे.

वाचा-भारताच्या माजी क्रिकेटपटूचा धोनीवर आरोप, ‘मनमानी थांबवून निवृत्तीवर विचार करावा’

या बाईकची सर्वात खास गोष्ट म्हणजे यात MotoGP स्टाईल डॉग रिंग ट्रांसमिशन गिअरबॉक्स देण्यात आला आहे. यामुळं कमी अंतरावरही बाईकचे गिअर बदलले जाऊ शकते. आता सध्या या बाईकची किंमत 35 लाख रूपये असून या त्याचे वजन 216 किलोग्राम आहे.

धोनीचे गाडी प्रेम

धोनीचे गाडी प्रेम सर्वांना माहित आहे. धोनीकडे फरारी 599 जीटीओ, हॅमर एच-2, जीएमसी सिएरा अशा गाड्या आहेत. तर, भारतात कोणाकडे नसतील अशा बाईकचा संग्रह आहे. धोनीकडे कावास्की निन्जा एच-2, कोनफेडेरेट हेलकॅट, बीएसए, सुजूकी हायाबूसा आणि एक नॉर्टन विंटेज अशा बाईक आहेत.

वाचा-क्रिकेटला मिळाला मलिंगाचा डुप्लिकेट! यॉर्करचा VIDEO पाहून व्हाल हैराण

ओव्हरटेक करणं बेतलं जीवावर! ट्रकनं दुचाकीला चिरडलं, दुर्घटनेचा CCTV VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: dhoni
First Published: Sep 27, 2019 05:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading