मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /'धोनीला निळ्या जर्सीत पाहायचंय, एक शेवटची मॅच' झारखंडच्या मुख्यमंत्र्यांनी BCCI ला केली विनंती

'धोनीला निळ्या जर्सीत पाहायचंय, एक शेवटची मॅच' झारखंडच्या मुख्यमंत्र्यांनी BCCI ला केली विनंती

झारखंडच्या सुपुत्राला (MS Dhoni) निळ्या जर्सीत आता आम्ही पाहू शकणार नाही. एक फेअरवेल मॅच आयोजित करा. झारखंड सगळी व्यवस्था करेल, असं आवाहन चक्क मुख्यमंत्र्यांनी BCCI ला केलं आहे.

रांची (झारखंड), 15 ऑगस्ट : कॅप्टन कूल, ग्रेट फिनिशर म्हणून नाव असलेला महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni retires) झारखंडचा (Jharkhand) लाडका माही आहे. झारखंडच्या मातीतला पहिलाच सुपुत्र देशाच्या कर्णधारपदी पोहोचला आणि सर्वात यशस्वी कर्णधारही ठरला. पण धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामाराम केल्याचं जाहीर केलं आणि त्याचे चाहते निराश झाले. आता यापुढे लाडका माही इंडियाच्या निळ्या जर्सीत दिसणार नाही.

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन (CM hemand soren) यांनी हेच दुःख Tweet मधून बोलून दाखवलं. एवढंच नाही, तर त्यांनी BCCI ला धोनीसाठी एक फेअरवेल मॅच रांचीत आयोजित करा, असं आवाहनही केलं आहे.

'धोनी झारखंडचा लाडका खेळाडू आहे. देश आणि झारखंडला अनेक अभिमानास्पद क्षण त्याने दिले आहेत. झारखंडच्या सुपुत्राला निळ्या जर्सीत आता आम्ही पाहू शकणार नाही. पण देशवासीयांचं अद्याप समाधान झालेलं नाही. माहीसाठी एक फेअरवेल मॅच रांचीत व्हायलाच हवी. सारं विश्व या मॅचचे साक्षीदार होईल. या मॅचची सगळी व्यवस्था झारखंड पाहील', असं आवाहन चक्क झारखंडच्या मुख्यमंत्र्यांनी BCCI ला केलं आहे.

स्वातंत्र्यदिनाच्या संध्याकाळी भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून कारकिर्द घडवणारा एम. एस. धोनी (M S Dhoni news) याने एक मोठी घोषणा केली आहे. T20 आणि एकदिवसीय क्रिकेटमधून त्याने निवृत्तीचा निर्णय जाहीर केला आहे. आंतरराष्ट्रीय टेस्ट क्रिकेट मधून यापूर्वीच धोनीने निवृत्ती घेतली होती. आता आंतरराष्ट्रीय एकदिवस आणि टी20 क्रिकेटलाही त्याने अलविदा केलं आहे.

First published:
top videos