MS Dhoni Retirement: धोनीच्या निवृत्तीवर अशी होती साक्षीची पहिली प्रतिक्रिया!
MS Dhoni Retirement: धोनीच्या निवृत्तीवर अशी होती साक्षीची पहिली प्रतिक्रिया!
साक्षी आणि धोनी यांच्या लग्नाला 10 वर्ष पूर्ण झाली आहेत. 2010मध्ये त्यांचे लग्न झाले होते. त्यावेळी धोनी भारतीय संघाचा कर्णधार होता. आता धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.
इन्स्टाग्रामवर धोनीनं व्हिडीओ शेअर करत क्रिकेटला अलविदा केला. धोनीच्या या निर्णयानं चाहत्यांना जबर धक्का बसला, तर दिग्गजांनी धोनीला नव्या इनिंगसाठी शुभेच्छा दिल्या.
नवी दिल्ली, 16 ऑगस्ट : भारताचा माजी कर्णधार आणि दिग्गज खेळाडू महेंद्रसिंग धोनीने (MS Dhoni retired) 15 ऑगस्ट रोजी निवृत्तीची घोषणा करत सर्वांनाच आश्चर्यचकित केले. इन्स्टाग्रामवर धोनीनं व्हिडीओ शेअर करत क्रिकेटला अलविदा केला. धोनीच्या या निर्णयानं चाहत्यांना जबर धक्का बसला, तर दिग्गजांनी धोनीला नव्या इनिंगसाठी शुभेच्छा दिल्या. मात्र धोनीच्या प्रत्येक निर्णयात त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असणाऱ्या साक्षीनं (Sakshi Dhoni) धोनीच्या व्हिडीओवर कमेंट करत प्रतिक्रिया दिली आहे.
धोनीनं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्याने आपल्या करिअरमधले सर्वोत्तम क्षण दाखवले आहेत. धोनीची पत्नी साक्षीनं या व्हिडीओवर हार्ट इमोजी टाकत प्रतिक्रिया दिली आहे. मुख्य म्हणजे याआधीही धोनीच्या निवृत्तीबाबत अनेकदा बातम्या आल्या होत्या. सोशल मीडियावर #dhoniretire ट्रेंड झाल्यानंतर साक्षीनं चाहत्यांना चांगलेच सुनावले होते. साक्षीनं ट्विट करत या सर्व अफवा असल्याचे सांगितले होते.
वाचा-'धोनीला निळ्या जर्सीत पाहायचंय, शेवटची मॅच' झारखंडच्या मुख्यमंत्र्यांची विनंती
वाचा-'ना कोई है ना कोई था MS के जैसा', माहीच्या निवृत्तीवर सचिन व सेहवागही भावुक
साक्षी प्रत्येक संकटात धोनीच्या पाठी खंबीरपणे उभी होती. साक्षी आणि धोनी यांनी 2010मध्ये लग्न केले होते. 2015मध्ये धोनी बाबा झाला. त्यानंतर केवळ धोनीच नाही तर चाहत्यांसाठी झिवाही स्टार झाली. नुकताच साक्षीनं एका लहान बाळासोबत झिवाचा फोटो पोस्ट केल्यानंतर चाहत्यांनी धोनीला दुसऱ्यांदा बाबा झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या होत्या. मात्र हे बाळ नक्की कोणाचे होते, हे अद्याप कळले नाही आहे.
वाचा-क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याच्या काही तासांपूर्वी पत्नी साक्षीची भावनिक पोस्टधोनीचे करिअर
धोनीनं 90 कसोटी सामन्यात 38.09च्या सरासरीनं 4876 धावा केल्या आहेत. तर, आतापर्यंत 350 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यात त्यानं 50.57च्या सरासरीनं 10 हजार 773 धावा केल्या आहेत. धोनीनं भारतासाठी 98 आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळले आहेत. यात 1617 धावा केल्या आहेत.
Published by:Priyanka Gawde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.