MS Dhoni Retirement: ...म्हणून धोनीनं बरोबर 7 वाजून 29 मिनिटांनी घेतली निवृत्ती? वाचून विश्वास बसणार नाही
MS Dhoni Retirement: ...म्हणून धोनीनं बरोबर 7 वाजून 29 मिनिटांनी घेतली निवृत्ती? वाचून विश्वास बसणार नाही
इन्स्टाग्रामवर धोनीनं व्हिडीओ शेअर करत क्रिकेटला अलविदा केला. यावेळी धोनीनं आपल्या पोस्टमध्ये '1929 तासांपासून मी निवृत्त झाले असं समजा', असे लिहिले होते.
नवी दिल्ली, 16 ऑगस्ट : महेंद्रसिंग धोनी हा भारतीय संघाला लाभलेल्या सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक होता. सौरव गांगुलीनंतर धोनीनं संघाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आणि भारताला दोन वर्ल्ड कप जिंकून दिले. मात्र 2019 वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न मात्र अधुरं राहिलं. धोनीनं 15 ऑगस्ट रोजी निवृत्तीची घोषणा करत सर्वांनाच आश्चर्यचकित केले. इन्स्टाग्रामवर धोनीनं व्हिडीओ शेअर करत क्रिकेटला अलविदा केला. यावेळी धोनीनं आपल्या पोस्टमध्ये '1929 तासांपासून मी निवृत्त झाले असं समजा', असे लिहिले होते. त्यानंतर चाहत्यांच्या मनात अनेक प्रश्न आले.
फिनीशर, उत्कृष्ठ विकेटकीपर म्हणून ओळखला जाणाऱ्या कॅप्टन कूलनं क्रिकेटमधून निवृत्तीही हटके प्रकारे घेतली. धोनीनं शायराना अंदाजात भावुक होत एक VIDEO शेअर केला आहे. 'मैं पल दो पल का शायर हूँ' असं म्हणत त्याने पूर्वीपासूनचे फोटोंचा कोलाज करत हा व्हिडीओ केला आहे. मात्र 1929 म्हणजे काय असा प्रश्न चाहत्यांच्या मनात होता. 1929 म्हणजे 7 वाजून 29 मिनिटं. मात्र धोनीनं 7 वाजून 29 मिनिटांनीच का निवृत्ती घेतली? हा कोणता खास मुहूर्त होता का? तर नाही.
वाचा-MS Dhoni Retirement: धोनीच्या निवृत्तीवर अशी होती साक्षीची पहिली प्रतिक्रिया!
वाचा-यंदा IPL मध्ये मैदानात चिअर करताना दिसणार नाहीत खेळाडूंच्या 'या' सुंदर पत्नी!
मीडिया रिपोर्टनुसार, 7 वाजून 29 मिनिटांनीच भारत वर्ल्ड कप 2019मधून न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या सेमीफायनलमधून बाहेर पडला होता. याच वेळेला धोनी शेवटचा मैदानात दिसला होता. मार्टिन गुप्तीलनं धोनीला आऊट केले होते, आणि भारताचे चॅम्पियन होण्याचे स्वप्न धुळीस मिळाले होते.
धोनी बाद झाल्यानंतर भारतीय संघासाठी हा सामना जिंकणे कठिण होते. शेवटच्या ओव्हरमध्ये युझवेंद्र चहल बाद झाल्यानंतर भारताचा वर्ल्ड कपमधला प्रवास संपला होता. त्यावेळी वेळ होती 7 वाजून 29 मिनिटं. न्यूझीलंडचा माजी क्रिकेटर ग्रॅन्ट एलिअटनं चहल बाद झाल्यानंतर भारत वर्ल्ड कपमधून बाद झाल्याचे ट्विट केले होते.
वाचा-'ना कोई है ना कोई था MS के जैसा', माहीच्या निवृत्तीवर सचिन व सेहवागही भावुक
धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी, धोनी आता युएइमध्ये 19 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आयपीएल 2020 स्पर्धेत खेळताना दिसणार आहे. चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा कर्णधार धोनी यावर्षी आपल्या संघाला चॅम्पियन करण्यास सज्ज आहे. धोनीसोबत त्याचा सहकारी आणि भारताचा आघाडीचा फलंदाज सुरैश रैनानेही निवृत्ती घेतली.
वाचा-रैनासुद्धा! धोनीच्या खास विश्वासू खेळाडूनेही माहीपाठोपाठ घेतला क्रिकेट संन्यासधोनीचे करिअर
धोनीनं 90 कसोटी सामन्यात 38.09च्या सरासरीनं 4876 धावा केल्या आहेत. तर, आतापर्यंत 350 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यात त्यानं 50.57च्या सरासरीनं 10 हजार 773 धावा केल्या आहेत. धोनीनं भारतासाठी 98 आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळले आहेत. यात 1617 धावा केल्या आहेत.
Published by:Priyanka Gawde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.