MS Dhoni Retires : गांगुलीच्या धाडसी निर्णयानं धोनीचं नशीबच बदललं; पाहा काय झालं होतं!

MS Dhoni Retires : गांगुलीच्या धाडसी निर्णयानं धोनीचं नशीबच बदललं; पाहा काय झालं होतं!

असंच कोणी महेंद्रसिंग धोनी (ms-dhoni-retirement-news) होत नाही. प्रत्येकाला एका संधीची गरज असते आणि ती संधी, विश्वास दाखवणारी व्यक्ती हवी असते. धोनीच्या बाबतीत काय झालं होतं वाचा..

  • Share this:

नवी दिल्ली, 15 ऑगस्ट : कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीने ( ms dhoni) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेत असल्याचं जाहीर केलं आणि अनेक माहीप्रेमींना धक्का बसला. धोनी निवृत्त होणार (dhoni retirement) असल्याच्या चर्चा सुरू असल्या तरी त्याच्या चाहत्यांना या अचान स्वातंत्र्यदिनादिवशी आलेल्या बातमीने हुरहूर लावली आहे.

असंच कोणी महेंद्रसिंग धोनी होत नाही. प्रत्येकाला एका संधीची गरज असते आणि ती संधी, विश्वास दाखवणारी व्यक्ती हवी असते. भारतीय क्रिकेटला महेंद्र सिंग धोनी या नावाची ओळख कोणी करुन दिली असेल तर ती म्हणजे सौरव गांगुली होय. गांगुलीने संधी दिली नसती तर धोनी भारतीय संघात दिसला नसता.

कशी मिळाली ती संधी?

डिसेंबर 2004 मध्ये बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेत भारतीय संघात धोनीचा समावेश करण्यात आला होता. पहिल्याच आंतरराष्ट्रीय सामन्यात धोनी पहिल्याच चेंडूवर बाद झाला. त्यानंतरच्या 3 सामन्यात धोनीला काही खास कामगिरी करता आली नाही. या 3 सामन्यात 12 ही त्यांची सर्वोच्च धावसंख्या होती. खराब कामगिरीमुळे संघाबाहेर जाण्याची भिती धोनीला होती. बांगलादेशविरुद्ध मालिकेनंतर भारताची सामना पाकिस्तानविरुद्ध होणार होता. विशाखापट्टणन येथे होणाऱ्या पाक विरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सौरव गांगुलीच्या डोक्यात काही वेगळच सुरु होते. धोनीच्या प्रथम श्रेणीतील खेळीमुळे गांगुली प्रभावित होता. पाकिस्तान सारख्या हायव्होल्टेज सामन्यात गांगुलीने एक धाडसी निर्णय घेतला. गांगुलीने तो खेळत असलेल्या क्रमांक 3 वर धोनीला फलंदाजीसाठी पाठवले. त्या सामन्यात धोनीने 148 धावांची स्फोटक खेळी केली. भारताचा एक नियमीत विकेटकिपरने वनडे क्रिकेटमध्ये झळकावलेले हे पहिले शतक ठरले होते.

Dhoni : कॅप्टन कुलच्या 38 गोष्टी ज्या तुम्ही कुठेच वाचल्या नसतील

या सामन्याबद्दल बोलताना धोनी म्हणाला, पाकिस्तानविरुद्धचा सामना माझ्यासाठी करो वा मरो असा होता. जर मी त्या सामन्यात चांगली कामगिरी केली नसती तर मी संघाबाहेर गेलो असतो. शतक झाल्यानंतर कळाले की, मला किमान आणखी 10 सामने खेळण्याची संधी मिळले. भारताने पाकविरुद्धचा सामना 58 धावांनी जिंकला होता आणि धोनीला सामनावीर पुरस्कार देण्यात आला होता.

गांगुलीच्या एका निर्णयामुळे धोनी वाचला...

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात धोनीला तिसऱ्या क्रमांकावर पाठवण्याचा निर्णय सौरव गांगुलीचा होता. गांगुलीने स्वत:च्या जबाबदारीवर धोनीला तिसऱ्या क्रमांकावर पाठवले होते. सामना झाल्यानंतर गांगुली म्हणाला, मी धोनीची फलंदाजी पाहिली होती. त्याच्या आक्रमक फलंदाजीसाठी एका संधीची गरज होती. आम्ही त्याला वरच्या क्रमांकावर पाठवले आणि त्याचा आत्मविश्वास वाढला. धोनीला अचानक तिसऱ्या क्रमांकावर पाठवल्यामुळे पाकिस्तानला देखील धक्का बसला होता.

धोनीचा भारतीय संघात समावेश झाला तेव्हा तो पहिल्या 2 सामन्यात त्याने 7व्या क्रमांकावर फलंदाजी केली होती. पाकविरुद्ध सामन्यासाठी जेव्हा संघाची घोषणा झाली तेव्हा धोनी 7व्या क्रमांकावरच खेळणार होता. नाणेफेक जिंकल्यावर मी ठरवले आज धोनी तिसऱ्या क्रमांकावर पाठवायचे. धोनीमध्ये क्षमता असल्याचे दिसत होते त्यामुळेच पाकविरुद्ध तिसऱ्या क्रमांकावर त्याला पाठवले. सामना सुरु झाल्यावर मी त्याला सांगितले की, आज तु तिसऱ्या क्रमांकावर खेळायचे. यावर धोनीने विचारले मग तुम्ही कोणत्या क्रमांकावर खेळणार. गांगुली म्हणाला चौथ्या क्रमांकावर...

विशेष म्हणजे गांगुली कर्णधार असताना धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तर धोनी कर्णधार असताना गांगुलीने अखेरचा सामना खेळला होता. अखेरच्या सामन्यात धोनीने आग्रह केल्यानंतर गांगुलीने कर्णधारपद स्विकारले होते.

गांगुलीने केला होता मोठा खुलासा

2003मध्ये भारतीय संघ वर्ल्ड कप खेळत होता तेव्हा धोनी रेल्वेत तिकीट कलेक्टर म्हणून काम करत होता. माझ्यासाठी ही गोष्ट धक्कादायकच होती. मी अनेक वर्षापासून धोनी सारख्या खेळाडूचा शोध घेत होतो. जो दबावाच्या प्रसंगी शांत राहील. ज्याच्यात एकट्याच्या हिमतीवर सामना फिरवण्याची क्षमता असेल.

गांगुलीने धोनीला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस पाठवले नसते तर क्रिकेटच्या क्षितीजावर धोनी हे नाव दिसले नसते.

Published by: अरुंधती रानडे जोशी
First published: August 15, 2020, 8:22 PM IST
Tags: MS Dhoni

ताज्या बातम्या