Home /News /sport /

धोनी लवकरच वन-डे क्रिकेट मधून घेऊ शकतो संन्यास, धोनीबाबत रवी शास्त्रींचं मोठं विधान

धोनी लवकरच वन-डे क्रिकेट मधून घेऊ शकतो संन्यास, धोनीबाबत रवी शास्त्रींचं मोठं विधान

भारतीय क्रिकेट टीमचा माजी कप्तान महेंद्र सिंग धोनीबाबत रवी शास्त्रींनी मोठं विधान केलं आहे. धोनी वनडे-क्रिकेट मधून लवकरच निवृत्त होवू शकतो असं शास्त्री म्हणाले आहेत.

    नवी दिल्ली, 9 जानेवारी: भारतीय क्रिकेट टिमचा माजी कॅप्टन महेंद्र सिंग धोनीबाबत रवी शास्त्रींनी मोठं विधान केलं आहे. धोनी वनडे-क्रिकेट मधून लवकरच निवृत्त होवू शकतो असं शास्त्री म्हणालेत.  गेल्या काही दिवसांपासून धोनीच्या क्रिकेट करिअर विषयी अनेक चर्चा सुरु आहेत. आता रवी शास्त्रींच्या विधानामुळे धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा पुन्हा सुरु झाल्या आहेत.  धोनी वनडे करिअर मधून निवृत्ती घेवू शकतो असे संकेत रवी शास्त्रींनी दिले आहेत. धोनीने टेस्ट क्रिकेटमधून याआधीच निवृत्ती घेतली आहे. कॅप्टन कूल धोनी वर्ल्ड कपनंतर क्रिकेटपासून दूरच आहे. गेल्या 6 महिन्यांपासून धोनी क्रिकेट खेळलाच नाही. त्यामुळं धोनीच्या क्रिकेट करिअरविषयी पुन्हा उलट-सुलट चर्चा सुरू झाली. काही महिन्यांपूर्वी धोनीनं आपण अजूनही क्रिकेट खेळणार असल्याचं सांगितलं होतं.. तसेच काही महिने वाट पाहा जानेवारी महिन्यात बोलणार असल्याचं धोनी म्हणाला होता. धोनी वनडे क्रिकेटमधून घेणार निवृत्ती भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी धोनीच्या निवृत्तीबाबत बोलताना धोनी टि-20 मधून खेळत राहिल असही म्हटलं आहे. मात्र टि-20 मध्ये खेळण्यासाठी धोनीला खेळण्यातलं सातत्य ठेवावं लागणार असल्याचही ते म्हणाले आहेत.धोनीने आत्तापर्यंत जबरदस्तीने स्वत:ला संघात स्थान देण्यासाठी कधीच आग्रह धरला नाही. आपण खेळू शकत नाही असं धोनीला वाटत असेल तर टेस्ट क्रिकेट प्रमाणे तो स्वत: त्याबाबत स्पष्ट करेल. जर धोनी IPLमध्ये चांगली कामगीरी करु शकला तर पुढेही धोनी त्याचा खेळ सुरु ठेवू शकतो असही मत रवी शास्त्रींनी व्यक्त केलं आहे. धोनी टि-20 मध्ये खेळणार रवी शास्त्रींनी जे संकेत दिले आहेत त्यावरुन यावर्षी ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या टि-20 वर्ल्ड कप मध्ये धोनी सहभागी होवू शकतो. त्यामुळे माही क्रिकेटच्या मैदानावर क्रिकेट चाहत्यांना कधी पाहायला मिळेल याची उत्सुकता आहे. न्यूझीलंड आणि भारत यांच्यात वर्ल्डकपची सेमीफायनल झाली होती. त्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला होता. तेव्हापासून धोनी क्रिकेटपासून दूर आहे. वर्ल्ड कपनंतर झालेल्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर धोनी गेला नव्हता. देशांतर्गत क्रिकेटही धोनी खेळला नाही. धोनी मित्र आणि कुटुंबासोबत वेळ घालवतोय. क्रिकेट सोडून इतर खेळांवर धोनी लक्ष केंद्रित करतोय. काही दिवसांपूर्वी धोनीनं जानेवारी महिन्यापर्यंत काहीही विचारू नका असं सांगितलं होतं. त्यामुळं जानेवारी महिना आता सुरू झाला. धोनी आता क्रिकेट करिअरविषयी काय निर्णय घेणार याची त्याच्या चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. ---------- ‘वर्ल्ड कप जिंकल्यानंतरच घेणार निवृत्ती’, रोहित शर्माचा गौप्यस्फोट! 'महाराष्ट्र केसरी'ला गदा दिली, बक्षिसाची रक्कम कुठे? बाउंड्री बाहेर घेतला कॅच, तरी फलंदाज झाला बाद! पाहा क्रिकेटमधला वादग्रस्त VIDEO
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: MS Dhoni, Ravi shastri

    पुढील बातम्या