20 वर्षांआधीची गाडी आणि 90 हजारांचा पायजमा, धोनीचा असा Rich Look तुम्ही कधीच पाहिला नसेल

20 वर्षांआधीची गाडी आणि 90 हजारांचा पायजमा, धोनीचा असा Rich Look तुम्ही कधीच पाहिला नसेल

चक्क 90 हजाराच्या पायजम्यात दिसला धोनी. पाहा हा व्हायरल व्हिडीओ.

  • Share this:

नवी दिल्ली, 23 ऑक्टोबर : रांचीमध्ये झालेल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पाणी पाजत भारतानं मालिकेवर कब्जा केला. या विजयादरम्यान टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनी यावेळी रांचीमध्ये उपस्थित होता. त्यामुळं भारताच्या विजयाचा आनंद दुप्पट झाला.

भारताच्या विजयादरम्यान धोनी मैदानात उपस्थित असल्यानं सर्वांनी आनंद व्यक्त केला. यावेळी धोनीनं कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या शाहबाज नदीमसोबत वेळ घालवला. त्याचबरोबर रवी शास्त्री यांच्यासोबत काढलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरलही झाला.

नव्या कोऱ्या लष्करी गाडीत मैदानात पोहचला धोनी

रांचीच्या आंतरराष्ट्रयी मैदानात धोनी आपल्या नव्या कोऱ्या जोंगा (Nissan Jonga) गाडीत पोहचला. धोनीनं ही गाडी काही दिवसांपूर्वी लष्कराकडून विकत घेतली होती. जिचा वापर याआधी लष्कराकडून करण्यात आला होता. जोंगा हे जबलपुर ऑर्डिनेंस अण्ड गन कॅरिज असेंबली याचे छोटे नाव आहे. धोनीनं पंजाबच्या एका व्यक्तीकडून ही गाडी विकत घेतली होती. ही गाडी 20 वर्षांआधीची आहे. ही गाडी जपानी कंपनी निसाननं तयार केली असून 1999नंतर याचे निर्मिती करण्यात आली नाही.

धोनीचा 90 हजारांचा पायजमा

यावेळी धोनी काळ्या रंगाचा टी-शर्ट, पांढऱ्या रंगाचा पायजमा आणि स्पोर्ट्स शुजमध्ये दिसला. यावेळी धोनीनं चक्क 90 हजारांचा वर्साचे या कंपनीचा पायजमा घातला होती. या पायजम्याची किंमत 1200 डॉलर म्हणजेच 90 हजार आहे.

धोनी वर्ल्ड कप 2019पासून एकही सामना खेळलेला नाही आहे. वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका दौऱ्यात धोनीनं विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान बांगलादेश विरोधात 24 ऑक्टोबरला भारतीय संघ घोषित होणार आहे. या मालिकेत धोनीला संघात स्थान मिळते का याबाबत गांगुली आणि कोहली चर्चा करणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 23, 2019 05:26 PM IST

ताज्या बातम्या