धोनीची घोड्यासोबत रेस, साक्षीने शेयर केला VIDEO

धोनीची घोड्यासोबत रेस, साक्षीने शेयर केला VIDEO

टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) रांचीच्या त्याच्या फार्म हाऊसवर कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. धोनी स्वत: सोशल मीडियावर फारसा ऍक्टिव्ह नसला, तरी त्याची पत्नी साक्षी (Sakshi Dhoni) अनेकवेळा फोटो आणि व्हिडिओ शेयर करते.

  • Share this:

मुंबई, 12 जून : टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) रांचीच्या त्याच्या फार्म हाऊसवर कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. धोनी स्वत: सोशल मीडियावर फारसा ऍक्टिव्ह नसला, तरी त्याची पत्नी साक्षी (Sakshi Dhoni) अनेकवेळा फोटो आणि व्हिडिओ शेयर करते, ज्यात धोनी दिसतो. साक्षीने शनिवारी असाच एक व्हिडिओ शेयर केला ज्यात धोनी आपल्या नव्या घोड्यासह धावताना दिसत आहे.

साक्षीने शेयर केलेल्या व्हिडिओमध्ये धोनीने काळ्या रंगाचा टीशर्ट घातला आहे. या व्हिडिओमध्ये धोनी आणि घोडा यांच्यात रेस सुरू असल्यासारखं वाटत आहे. मजबूत, जलद असं कॅप्शन साक्षीने या व्हिडिओला दिलं आहे. तसंच तिने शेटलँड पोनी आणि रेसिंग असे हॅशटॅगही दिले.

धोनीने शेटलँड पोनी जातीचा घोडा स्कॉटलंडहून त्याच्या फार्महाऊसवर आणला आहे. 2 वर्षांचा हा घोडा जगातल्या सगळ्यात लहान जातीच्या घोड्यांपैकी एक आहे. या घोड्याची उंची 3 फूटांच्या आसपास असते. शेटलँड पोनी जातीचा घोडा त्याच्या वेगासाठी नाही, तर सजावटीसाठी ओळखला जातो. या घोड्याची आंतरराष्ट्रीय बाजारातली किंमतही खूप जास्त आहे.

शेटलँड पोनी जातीचा हा घोडा धोनीच्या सिमलियातल्या घरी ठेवण्यात आला आहे. धोनीकडे असलेला चेतक हा आणखी एक घोडा सॅम्बोमधल्या फार्म हाऊसमध्ये आहे. काहीच दिवसांपूर्वी धोनीची पत्नी साक्षी या फार्म हाऊसवर आली होती, तेव्हाही तिने चेतकचा फोटो सोशल मीडियावर शेयर केला होता.

धोनीच्या फार्म हाऊसवर आलेला पहिला घोडा चेतक आता 11 महिन्यांचा आहे. हा घोडा मारवाडी जातीचा आहे. काळ्या रंगाचा असलेला चेतक त्याच्या वेगासाठी ओळखला जातो. तर शेटलँड पोनी जातीचा घोडा पांढऱ्या रंगाचा आहे. स्कॉटलंडवरून हा घोडा भारतात आणण्यासाठी धोनीने लाखो रुपये खर्च केले. धोनीच्या फार्महाऊसमध्ये सघ्या हॉर्स रायडिंगची तयारी सुरू आहे, त्यामुळे 5 ते 6 घोडे बाहेरून मागवण्यात येणार आहेत.

Published by: Shreyas
First published: June 12, 2021, 8:52 PM IST
Tags: MS Dhoni

ताज्या बातम्या