धोनीच्या निवृत्तीची Inside Story, आई-बाबा म्हणतात...

धोनीच्या निवृत्तीची Inside Story, आई-बाबा म्हणतात...

धोनीच्या निवृत्तीवर त्याच्या आई-बाबांनी पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया.

  • Share this:

नवी दिल्ली, 17 जुलै : ICC Cricket World Cup स्पर्धेनंतर भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीच्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र, धोनीनं अधिकृतरित्या आपल्या निवत्तीवर भाष्य केलेले नाही. दरम्यान धोनी एवढ्यात निवृत्ती घेणार नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी धोनीला आणखी काही काळ देशासाठी खेळण्याची विनंती केली आहे.

दरम्यान, धोनीच्या निवृत्तीवर त्याच्या आई-बाबांचे मत वेगळे आहे. भारतीय संघ ऑगस्टमध्ये वेस्ट इंडीज दौऱ्यावर जाणार आहे. यामध्ये धोनी संघात नसेल आणि तो काही दिवसांत निवृत्त होईल अशी चर्चा आहे. मात्र, सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार धोनी इतक्यात निवृत्ती घेणार नाही. त्याआधी त्याला मोठी जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. मात्र धोनीचे शालेय जीवनातील प्रशिक्षक केशव बॅनर्जी यांनी एका यु-ट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत धोनीच्या आई-बाबांना त्याच्या निवृत्तीबाबत काय वाटते याचा खुलासा केला आहे.

धोनीचे पहिले प्रशिक्षक असलेल्या केशव यांना धोनीच्या निवृत्तीबाबत विचारले असता त्यांनी, " धोनीनं आता निवृत्ती नाही घ्यावी, आणखी एक वर्ष त्यांने क्रिकेट खेळावे. पुढच्या वर्षी ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये धोनी खेळला तर ते संघासाठी चांगले आहे. धोनीमध्ये अजूनही क्रिकेट बाकी आहे. तो फिट आहे", असे मत व्यक्त केले.

वाचा- आता तर शास्त्री आणि विराटही म्हणाले; धोनी तुझी गरज आहे, निवृत्ती घेऊ नको!

'धोनीला आता पुन्हा निळ्या जर्सी पाहायचे नाही '

दरम्यान धोनीच्या आई-बाबांना त्याच्या निवृत्तीबाबत काय वाटते, असे विचारले असता केशव यांनी, "मी धोनीच्या घरी गेलो होतो. त्याच्या आई-बाबांशी मी याविषयावर चर्चा केली. त्यांनी यावर, "धोनीनं क्रिकेट सोडावे. त्याला आता पुन्हा निळ्या जर्सीमध्ये नाही पाहायचे आहे. त्यानं आता घर आणि आपल्या कुटूंबासाठी वेळ द्यावा", असे सांगितले.

वाचा-  चाहत्यांसाठी खूशखबर! धोनी हे काम पूर्ण केल्याशिवाय निवृत्त होणार नाही

विराट आणि शास्त्रींनी केली धोनीला विनंती?

दरम्यान काही सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विराट कोहली आणि रवी शास्त्री यांनी जोपर्यंत ऋषभ पंत सेट होत नाही तोपर्यंत धोनीला खेळण्याची विनंती केली आहे. दरम्यान धोनी संघासोबत राहून पंतला मार्गदर्शन करेल. तसेच धोनी पुढच्या वर्षी होणाऱ्या आयपीएलमध्येही चेन्नई सुपरकिंग्ज संघाकडून खेळणार आहे. त्यानंतर धोनी टी-20 आणि एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊ शकतो.

धोनी वेस्ट इंडिज दौऱ्याला मुकणार

वेस्ट इंडीज दौऱ्यावर धोनी संघात नसेल. तो यापासून दूर राहणार असला तरी संघात होणाऱ्या बदलासाठी तो मदत करणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार धोनी वेस्ट इंडीजला जाणार नाही. भारताच्या संघात धोनी 15 जणांमध्ये असेल पण तो अंतिम अकरामध्ये नसेल. त्याच्या जागी ऋषभ पंत यष्टीरक्षक म्हणून संघात खेळण्याची शक्यता आहे.

वाचा-  शोध प्रशिक्षकाचा : गॅरी कर्स्टन यांच्यासह 3 नावं चर्चेत!

VIDEO: नागपुरात पाणीबाणी, 1500 टँकरच्या फेऱ्या रद्द, इतर टॉप 18 बातम्या