कॅप्टन कुल धोनी आता होणार हिरो! बॉलीवूडच्या 'बाबा'च्या सिनेमात करणार पदार्पण

गेले दोन महिने क्रिकेटपासून लांब असलेला धोनी आता क्रिकेटमध्ये एण्ट्री करण्याच्या विचारात आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 24, 2019 04:53 PM IST

कॅप्टन कुल धोनी आता होणार हिरो! बॉलीवूडच्या 'बाबा'च्या सिनेमात करणार पदार्पण

नवी दिल्ली, 24 सप्टेंबर : भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि स्टार खेळाडू महेंद्रसिंग धोनी गेले दोन महिने एकही सामना क्रिकेटपासून लांब आहे. धोनीनं शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना वर्ल्ड कप 2019मध्ये न्यूझीलंड विरोधात खेळला. त्यानंतर धोनी वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गैरहजर राहिला. त्यामुळं धोनी निवृत्ती घेणार का, अशा चर्चा जोर धरत आहेत. मात्र धोनीनं अद्याप याबाबत काही अधिकृत माहिती दिलेली नाही.

दुसरीकडे, धोनी क्रिकेट खेळत नसला तरी आता तो चक्क चित्रपटांमध्ये पदार्पण करणार आहे. त्यामुळं क्रिकेटचे मैदान सोडून धोनी चित्रपटांमध्ये दणक्यात एण्ट्री करण्यात तयार आहे. बॉलिवूडचा माचो मॅन संजय दत्तसोबत क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी चित्रपटात काम करताना दिसणार आहे. वायकॉम 18 स्टुडीओ प्रोडक्शन संजय दत्तसोबत चित्रपट करणार आहे. यमला पगला दीवाना फेम दिग्दर्शक समीर कर्णिक या चित्रपटाचे दिग्दर्शक करणार आहे. या चित्रपटाचे नाव डॉगहाऊस असणार आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. या चित्रपटाची कथा तीन अंडरडॉग्सच्या संबंधित असणार आहे. या चित्रपटाच्या प्रमुख भुमिकेत बरेच मोठे कलाकार असणार आबेत. या चित्रपटात सध्या संजय दत्त यांना प्रमुख भुमिकेत असणार आहे. यासंबंधित इतर कलाकारांची निवड दिग्दर्शक करणार आहेत. या चित्रपटात संजय दत्तसोबत सुनील शेट्टीही असणार आहेत.

दरम्यान या चित्रपटांमध्ये महेंद्रसिंग धोनी पाहुण्या कलाकाराची भुमिका साकारणार आहे. पुढच्या काही दिवसांत याबाबत अधिकृत माहिती देतील. दरम्यान धोनी दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज यांच्याविरोधात हंगाम खेळण्याशिवाय आता बांगलादेश विरोधातही मालिका खेळणार नाही आहे. वर्ल्ड कप दरम्यान धोनीच्या धिम्या खेळीवरून टीका करण्यात आली होती. त्यानंतर धोनीनं काही काळ क्रिकेटमधून विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला. विश्रांती घेतल्यानंतर धोनीनं लष्करात सामिल होण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार 15 दिवस धोनीनं जम्मू काश्मीरमध्ये ट्रेनिंग घेतले. दरम्यान धोनी दक्षिण आफ्रिकानंतर बांगलादेश विरोधात होणाऱ्या मालिकेत खेळू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

आयपीएलचा पुढचा हंगाम खेळणार धोनी

आयपीएलमधील संघ चेन्नई सुपरकिंग्जचे मालक एन. श्रीनिवासन यांनी महेंद्रसिंग धोनीच्या आयपीएलमध्ये खेळण्याबाबत मोठे विधान केले आहे. धोनीनं कर्णधार म्हणून चेन्नई सुपरकिंग्ज संघाला तीन वेळा विजेतेपद मिळवून दिले. त्यामुळं येत्या आयपीएल हंगामात धोनी खेळणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या सगळ्या प्रकरणावर सीएसकेचे मालक श्रीनिवासन यांनी मोठा खुलासा केला आहे. श्रीनिवासन यांनी धोनीच पुढच्या हंगामात कर्णधार असल्याचे स्पष्ट केले आहे. टाईम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत धोनी आयपीएलच्या हा हंगाम खेळणार असल्याचे सांगितले.

Loading...

VIDEO: 'हिंदुस्तान आणि पाकिस्तानचं विभाजन सोपं होतं पण युतीची वाटणी सोपी नाही'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 24, 2019 04:53 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...