धोनीनं का घेतली आफ्रिका दौऱ्यातून माघार? आता करणार 'हे' काम

धोनीनं का घेतली आफ्रिका दौऱ्यातून माघार? आता करणार 'हे' काम

विंडीजपाठोपाठ धोनीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दौऱ्यातून माघार घेतल्यानंतर त्याच्या निवृत्तीच्या चर्चांणा उधाण आलं आहे.

  • Share this:

मुंबई, 30 ऑगस्ट : सध्या भारतीय संघ विंडीज दौऱ्यावर आहे. त्यानंतर होणाऱ्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून भारताचा क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीनं माघार घेतल्यानं पुन्हा त्याच्या निवृत्तीच्या चर्चांना उधाण आलं आहे. वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये पराभवानंतर त्याच्या निवृत्तीवरून उटल सुलट चर्चा होत होती. आता आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठीसुद्धा आपण उपलब्ध नसल्याचं सांगितल्यानंतर धोनी काय करणार याकडं सर्वांच लक्ष लागून राहिलं आहे.

भारताच्या क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी20 मालिकेत खेळणार नाही. त्यानं स्वत: बीसीसीआयला याची माहिती दिली होती. याआधी विंडीज दौऱ्यावरही त्यानं माघार घेतली होती. त्यावेळी धोनी 15 दिवस लष्करी प्रशिक्षण घेण्यासाठी गेला होता. आता धोनी भविष्याबद्दल मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचंही म्हटलं जात आहे. अद्याप त्यानं क्रिकेटमधून निवृत्ती कधी घेणार हे स्पष्ट केलेलं नाही. दरम्यान तो आता बॉलीवूडमध्ये नशीब अजमावण्याची शक्यता आहे.

धोनी बॉलीवूडमध्ये गुंतवणूक करण्याची शक्यता असून तो लवकरच याबाबत जाहीरपणे सांगेल असं म्हटलं जात आहे. धोनी चित्रपटसृष्टीत फिल्म प्रोड्युसर म्हणून दिसू शकते. डेक्कन क्रॉनिकलने दिलेल्या बातमीनुसार, धोनीला चित्रपटांची आवड आहे. त्याच्या आयुष्यावरही एक चित्रपट आला होता.

धोनीच्या आयुष्यावर चित्रपटाची निर्मिती सुरु होती तेव्हा त्यानं निर्मिती प्रक्रिया समजून घेतली होती. आता तो मित्र आणि बॉलीवूड अभिनेता जॉन अब्राहमसोबत पहिल्या प्रोजेक्टवर काम करू शकतो. याबद्दल अद्याप अधिकृतपणे काही जाहीर करण्यात आलेल नाही. धोनी हा जॉन अब्राहमचा चाहता आहे. म्हणूनच त्यानं लांब केसांची स्टाईल केली होती.

वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडकडून मिळालेल्या पराभवानंतर धोनीच्या निवृत्तीचीच चर्चा सुरू झाली. त्यानंतर धोनी निवृत्ती घेणार होता मात्र निवड समितीने त्याला थांबवलं असंही म्हटलं जात होतं. निवड समितीनं म्हटलं आहे की, पुढच्या वर्षी होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपपर्यंत धोनीची संघाला गरज आहे. पंतला तयार करण्यासाठी त्याचं योगदान महत्त्वाचं ठरणार आहे असं निवड समितीने सांगितलं होतं.

वाचा : सलग दुसऱ्या मालिकेत धोनीला वगळले! असा आहे आफ्रिकेविरुद्धचा भारतीय संघ

हार्दिक पांड्याचं लवकरच शुभमंगल सावधान? 'या' अभिनेत्रीनं केलं क्लीन-बोल्ड

Published by: Suraj Yadav
First published: August 30, 2019, 12:43 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading