...अन् 'माही'वर आली पाणीपुरी बनवण्याची वेळ, सोशल मीडियावर VIDEO VIRAL

...अन् 'माही'वर आली पाणीपुरी बनवण्याची वेळ, सोशल मीडियावर VIDEO VIRAL

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी मालदिवमध्ये सुट्टी एन्जॉय करतो आहे. पत्नी साक्षी धोनी आणि काही मित्रांसोबत तो सुट्टी मजेत घालवताना दिसत आहे. मालदिवमधील त्याचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आताच माहीचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये तो चक्क एका पाणीपुरीच्या स्टॉलवर पाणीपुरी बनवताना दिसला.

  • Share this:

मालदिव, 5 फेब्रुवारी : भारतीय क्रिकेट टीम यशाची शिखरं पार करत असताना भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी मालदिवमध्ये सुट्टी एन्जॉय करतो आहे. पत्नी साक्षी धोनी आणि काही मित्रांसोबत तो सुट्टी मजेत घालवताना दिसत आहे. मालदिवमधील त्याचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आताच माहीचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये तो चक्क एका पाणीपुरीच्या स्टॉलवर पाणीपुरी बनवताना दिसला. आपल्या मित्रांना पाणीपुरी बनवून देताना माहीचा एक वेगळा अंदाज पहायला मिळाला.

धोनीचे कुटुंबीयांसोबतचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर कायम हिट ठरतात.

(हेही वाचा :‘स्वत:च्या फायद्यासाठी मला...’, धोनीने केले साक्षीवर गंभीर आरोप! VIDEO VIRAL)

‘पाणीपुरी Special’ व्हिडीओ देखील धोनी फॅन्सच्या पसंतीस पडत आहे. धोनीच्या एका फॅनने त्याचा हा व्हिडीओ ट्विट केला आहे. ‘थेट मालदिवमधून, आपला रॉकस्टार पाणीपुरी बनवताना. आपलं आवडीचं चाट आता आणखी रुचकर झालं आहे’ असं कॅप्शन देत या फॅनने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओवर माहीच्या हजारो चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत. कुणी ‘पाणीपुरी खाणारे किती लकी आहेत’ असं म्हटलं आहे, तर काही युजर्सनी धोनीचा खेळ पुन्हा पाहण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

38 वर्षीय माहीने जुलै 2019 पासून कोणताही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही आहे. भारत विश्वचषकात (World Cup) न्यूझीलंडविरोधात हरल्यानंतर धोनीने आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. बीसीसीआयने धोनीला आपल्या काँट्रक्ट लिस्टमधून देखील बाहेर काढलं आहे.  या काळात तो आपल्या कुटुंबीयांसोबत अधिक वेळ घालवताना दिसला. मात्र धोनीने पुन्हा कमबॅक करावं अशी त्याचा लाखो फॅन्सची इच्छा आहे.

अन्य बातम्या

दिशाचं 'हे' प्रेम तुम्हाला माहित आहे का? भारताच्या युवा खेळाडूबद्दल म्हणते...

न्यूझीलंडच्या एका खेळाडूने केलेली चूक दुसऱ्याने सुधारली पण तोपर्यंत उशीर झाला

टीम इंडियाची यंग ब्रिगेड फायनलमध्ये, 5 खेळाडूंनी मिळवून दिला विजय

भारताच्या युवा स्टारचा अफलातून कॅच, VIDEO पाहून युवराज आणि रैनाला विसरून जाल!

First published: February 5, 2020, 1:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading