धोनीची बॅग घेऊन गेला दुसराच व्यक्ती, एअरपोर्टवर उडाला गोंधळ

धोनीची बॅग घेऊन गेला दुसराच व्यक्ती, एअरपोर्टवर उडाला गोंधळ

एअरपोर्टवर धोनीबाबत घडला अजब प्रकार, वाचा नक्की काय झालं.

  • Share this:

कोलकाता, 10 डिसेंबर : भारतीय संघाचा माजी कर्णधार सध्या क्रिकेटपासून दूर आहे. वर्ल्ड कप 2019नंतर धोनीनं एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. असे असले तरी धोनी नेहमीच चर्चेत असतो. आता कोलाकाता विमानतळावरून चक्क एमएस धोनीचे सामान गायब झाल्याची बातमी आहे. मीडिया रिपोर्टनुसार दुसराच प्रवासी नकळत धोनीचे सामना घेऊन गेला. प्रथम धोनीला याबद्दलही माहिती नव्हती, परंतु नंतर त्याने एअरलाइन्स कंपनीला त्याविषयी माहिती दिली.

धोनीचे सामान गायब

टाईम्स नाऊच्या वृत्तानुसार, एमएस धोनी सोमवारी कोलकाता येथे एका खासगी कार्यक्रमासाठी पोहोचला होता. यावेळी धोनीचे सामान एक दुसराच व्यक्ती घेऊन गेला. यानंतर एअरलाइन्स कंपनीने स्वत: धोनीला सांगितले की, त्याचे सामान गायब झाले आहे. यानंतर, एअरलाइन्स कंपनीने धोनीचे सामान घेऊन जाणाऱ्या व्यक्तीशी संपर्क साधत, बॅग परत मिळवली. एवढेच नव्हे तर एअरलाइन्स कंपनीनेही आपली चूक नाकारली आहे.

वाचा-धोनीबद्दल शास्त्रींचा मोठा खुलासा, 'त्याला विश्रांती घ्यायची होती पण...'

क्रिकेटपासून दूर आहे धोनी

महेंद्रसिंग धोनी गेले तीन-चार महिने क्रिकेटपासून दूर आहे. नुकतेच टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी, धोनी लवकरच कमबॅक करणार असल्याचे सांगितले. असे असले तरी धोनी जानेवारीपर्यंत क्रिकेट खेळणार नसल्याचेही यावेळी सांगितले. तर, धोनीनं रविवारी झालेल्या कार्यक्रमात, 'मी आता ऐवढच सांगू शकतो की जानेवारीपर्यंत क्रिकेट खेळणार नाही. जानेवारी महिन्यात रांची येथे थोड्या सराव सत्रानंतर मी काय करावे ते ठरवेल. झारखंडमध्ये खेळण्याशिवाय माझा माझा अंडर-23 संघ किंवा रणजी संघाशी सराव आहे. पण याखेरीज इतर कोणतेही क्रिकेट नाही.'

वाचा-मुंबई इंडियन्स लावणार 'विराट'वर बोली, लिलावात हे 5 खेळाडू रडारवर

मार्चमध्ये धोनी करणार कमबॅक

धोनी आता मार्चमध्ये क्रिकेटमध्ये कमबॅक करू शकतो. मात्र धोनी टीम इंडियाकडून नाही तर बांगलादेशमधून क्रिकेट खेळणार आहे. इंडिया टूडेनं दिलेल्या बातमीनुसार, बांगलादेश क्रिकेट बोर्डानं बीसीसीआयकडे सात खेळाडूंची मागणी केली आहे. हे खेळाडू आशियाई इलेव्हन संघाकडून रेस्ट ऑफ वर्ल्ड संघाविरोधात 2 टी-20 सामने खेळतील. हे दोन्ही सामने पुढच्या वर्षी 18 आणि 21 मार्चला होणार आहे. या बातमीनुसार टीम इंडियापासून तीन महिने लांब असलेल्या धोनीचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळं बीसीसीआयनं परवानगी दिल्यास धोनी बांगलादेशमधून क्रिकेटमध्ये कमबॅक करू शकतो. बांगलादेशच्या वतीनं बीसीसीआयकडे महेंद्रसिंग धोनीबरोबरच, कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार आणि रवींद्र जडेजा यांची मागणी केली आहे.

वाचा-IPL लिलावात होणार टक्कर! ‘या’ खेळाडूंसाठी भिडणार मुंबई आणि बंगळुरू संघाचे मालक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 10, 2019 03:28 PM IST

ताज्या बातम्या