मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

टीम इंडियाच्या Insta Live वर धोनीची एण्ट्री, मग काय झालं? तुम्हीच पाहा VIDEO

टीम इंडियाच्या Insta Live वर धोनीची एण्ट्री, मग काय झालं? तुम्हीच पाहा VIDEO

मंगळवारी सोशल मीडियावर एमएस धोनी (MS Dhoni) अचानक ट्रेण्डिंगमध्ये आला, याला कारण ठरलं टीम इंडियाचा विकेट कीपर ऋषभ पंतचं (Rishabh Pant) इन्स्टाग्राम लाईव्ह (Insta Live).

  • Published by:  Shreyas
मुंबई, 26 जुलै : मंगळवारी सोशल मीडियावर एमएस धोनी (MS Dhoni) अचानक ट्रेण्डिंगमध्ये आला, याला कारण ठरलं टीम इंडियाचा विकेट कीपर ऋषभ पंतचं (Rishabh Pant) इन्स्टाग्राम लाईव्ह (Insta Live). ऋषभ पंत भारतीय टीमच्या खेळाडूंसोबत इन्स्टा लाईव्ह करत होता तेव्हा तिकडे एमएस धोनीही आला. पंतने त्याच्या लाईव्हमध्ये धोनीला आणण्याचा प्रयत्न केला, पण यात त्याला फारसं यश मिळालं नाही. ऋषभ पंत टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) यांच्यासोबत इन्स्टा लाईव्ह करत होता, तेव्हा त्याने एमएस धोनीलाही त्यात ऍड केलं. एमएस धोनी लाईव्हला आलेला पाहून रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनाही आश्चर्याचा धक्का बसला, कारण धोनी सोशल मीडियापासून लांब असतो. 'माही भाई क्या हाल है? रखो रखो भैया को थोडा लाईव्ह पे रखो,' असं पंत धोनी दिसल्यावर म्हणाला, पण धोनीने लगेचच त्याच्या फोनचा कॅमेरा बंद केला. या महिन्याच्या सुरूवातीला एमएस धोनी भारताच्या इंग्लंड दौऱ्यात टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये दिसला होता. इशान किशन आणि टीम इंडियाच्या इतर खेळाडूंसोबत बोलतानाचे धोनीचे फोटो बीसीसीआयने ट्विटर अकाऊंटवरून शेअर केले होते. ऋषभ पंत कर्णधार रोहित शर्मा, दिनेश कार्तिक, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव आणि आर.अश्विन यांच्यासोबत मंगळवारी वेस्ट इंडिजमध्ये पोहोचला आहे. हे सगळे खेळाडू वेस्ट इंडिजविरुद्धच्या 5 टी-20 मॅचच्या सीरिजआधी टीम इंडियात दाखल होती. 29 जुलै ते 7 ऑगस्टदरम्यान ही सीरिज खेळवली जाणार आहे. वनडे सीरिजसाठी या खेळाडूंना आराम देण्यात आला होता. टी-20 सीरिजची पहिली मॅच त्रिनिदादच्या ब्रायन लारा स्टेडियमध्ये होईल, यानंतर दोन सामने सेंट किट्समध्ये तर शेवटचे दोन सामने फ्लोरिडाच्या स्टेडियममध्ये खेळवले जातील. टी-20 सीरिजआधी वनडे सीरिजची शेवटची मॅच बुधवारी होणार आहे. तीन वनडे मॅचच्या या सीरिजमध्ये पहिल्या दोन मॅच जिंकून टीम इंडियाने आधीच सीरिज खिशात टाकली आहे.
First published:

Tags: MS Dhoni, Rishabh pant

पुढील बातम्या