‘धोनी, सचिन आणि सनी लिओनी…’ यांची नावे सर्च करण्याआधी राहा सावधान!

‘धोनी, सचिन आणि सनी लिओनी…’ यांची नावे सर्च करण्याआधी राहा सावधान!

धोनी, सचिन किंवा सनी यांची नावे गुगलवर सर्च करण्याआधी वाचा ही बातमी.

  • Share this:

मुंबई, 22 ऑक्टोबर : जगभरात सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी, पीव्ही सिंधू आणि ख्रस्तियानो रोनाल्डो यांचे चाहते नाहीत अशा फार कमी जागा आहेत. मात्र जर तुम्हाला कोणी सांगितले की, हेच दिग्गज खेळाडू सर्वात धोकादायक आहेत असे सांगितले तर तुम्हाला धक्का बसेल.

दिवसभर तुम्ही इंटरनेटवर वेगवेगळ्या गोष्टी सर्च करत असतात. सध्या तरी, सनी लिओनी आणि महेंद्रसिंग धोनी गुगल सर्चमध्ये अग्रस्थानी आहेत, मात्र हीच नावे सर्वात खतरनाकही आहेत. मॅकफे (McAfee)नं नुकतीच्या आपल्या रिचर्समध्ये सर्वात धोकादायक सेलिब्रिटी यांची यादी जाहीर केली. यात दिग्गज खेळाडूंपासून बॉलीवूडच्या अभिनेत्री-अभिनेत्यापासून सर्व आहेत. मुख्य गोष्ट म्हणजे, या सेलिब्रिटींचे नाव सर्च केल्यानंतर व्हायरस असलेली नवी वेबसाईट ओपन होते. यात तुमच्या कम्प्युटरला हानी पोहचवणारे व्हायरस असतात.

वाचा-पगारवाढीसाठी कर्णधारासह संपूर्ण संघ संपावर, टी-20 वर्ल्ड कप धोक्यात

या यादीमध्ये सर्वात प्रथम नाव आहे, भारताला कॅप्टन कुल महेंद्रसिंग धोनी पहिल्या क्रमांकावर आहे. मात्र तेवढेच नाव धोनीचे सायबर दुनियेतही आहे. धोनीच्या नावामुळं व्हायरस पसरवला जात आहे, ज्यामुळं तुमचे पासवर्डही चोरले जाऊ शकतात. या यादीत दुसरा क्रमांक सचिन तेंडुलकरचा आहे.

वाचा-हा तर कॅच नव्हताच! पाहा आफ्रिकेविरुद्ध साहाचा अफलातून VIDEO

या टॉप-10 यादीमध्ये सचिन, धोनी यांच्यासह महिला क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर आणि विश्व चॅम्पियन बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूही आहे. याचबरोबर दिग्गज फुटबॉलपटू ख्रिस्तायानो रोनाल्डो याचेही या यादीत नाव आहे. याचबरोबर बिग बॉस विजेता गौतम गुलाटी, बॉलिवुड अभिनेत्री सनी लिओनी, पॉप सिंगर बादशाह, अभिनेत्री राधिका आपटे आणि श्रद्धा कपूरही आहेत.

वाचा-यंदा कर्तव्य आहे! स्टार क्रिकेटपटू अडकणार सर्बियन मॉडेलच्या बंधनात

टॉप 10 खतरनाक सेलिब्रिटी

1. महेंद्रसिंग धोनी

2. सचिन तेंडुलकर

3. गौतम गुलाटी

4. सनी लिओनी

5. बादशाह

6. राधिका आपटे

7. श्रध्दा कपूर

8. हरमनप्रीत कौर

9. पीव्ही सिंधू

10. ख्रिस्तियानो रोनाल्डो

First published: October 22, 2019, 5:25 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading