'या' कारणामुळे अजूनही विराटपेक्षा धोनीच वरचढ, दिग्गज क्रिकेटपटूनं व्यक्त केलं मत

कसोटी मालिका आपल्या खिशात कर्णधार विराट कोहलीनं आपल्या नावावर एका विक्रमाची नोंद केली.

News18 Lokmat | Updated On: Sep 5, 2019 05:43 PM IST

'या' कारणामुळे अजूनही विराटपेक्षा धोनीच वरचढ, दिग्गज क्रिकेटपटूनं व्यक्त केलं मत

मुंबई, 05 सप्टेंबर : वेस्ट इंडिजमध्ये भारतीय संघानं विक्रमी कामगिरी करत तिन्ही फॉरमॅटमध्ये आपला डंका वाजवला. भारतानं टी-20, कसोटी आणि एकदिवसीय अशा तिन्ही मालिका आपल्या खिशात घातल्या. कसोटी मालिका आपल्या खिशात कर्णधार विराट कोहलीनं आपल्या नावावर एका विक्रमाची नोंद केली. विराटनं केवळ 48 कसोटी सामन्यात 58.33च्या सरासरीनं 28 सामना जिंकले आहेत. यासह विराटनं धोनीला मागे टाकले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये धोनीनं 60 कसोटी सामन्यात 27 सामन्यांमध्ये विजय मिळवून दिला होता. असे असले तरी, भारताचे माजी विकेटकिपर सैयद किरमानी यांनी विराट नाही तर धोनीच सर्वश्रेष्ठ कसोटी कर्णधार असल्याचे सांगितले आहे.

विराट नाही धोनी आहे बेस्ट कर्णधार

सैयद किरमानी धोनीला विराट कोहलीपेक्षा सर्वश्रेष्ठ मानले आहे. किरमानी यांनी, “धोनी जेव्हा कर्णधार होता तेव्हा त्यानं तिन्ही फॉरमॅटमध्ये भारताला विजय मिळवून दिला होता. त्यानं स्वत:ला भारताचा सर्वोत्तम कर्णधार बनवले. त्यानंतर विराटनं कर्णधारपद सांभाळले. त्याल आणखी रेकॉर्ड करण्यासाठी वेळ द्यावा लागले. त्यामुळं त्याला सर्वोत्तम कर्णधार म्हणता येणार नाही. विराट कोहलीला मोठा प्रवास करायचा आहे”, असे मत व्यक्त केले.

म्हणून विराट सर्वोत्तम फलंदाज

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतानं पहिल्यांदा ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी सामना जिंकला. भारतानं कांगारूंना त्यांच्याच घरच्या मैदानावर 2-1ने मात दिली. विराटच्या नेतृत्वाखाली भारतानं कसोटी क्रिकेटमध्ये नंबर-1 ची जागाही मिळवली. मात्र अजूनही विराटच्या नेतृत्वात कमतरता आहे. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतानं आयसीसीची स्पर्धा जिंकलेली नाही. विराट कोहलीनं वर्ल्ड कप 2019मध्ये ही संधी गमावली. मात्र पुढच्या वर्षी येणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये विराटही कमी पूर्ण करू शकतो.

Loading...

विराटनं गमवलं पहिले स्थान

वेस्ट इंडिज दौऱ्यावर असलेल्या विराट कोहलीला एक मोठा धक्का बसला आहे. कर्णधार कोहलीनं या दौऱ्यावर ऐतिहासिक कामगिरी केली असली तरी, फलंदाजीमध्ये त्याला विशेष चांगली कामगिरी करता आली नाही. दुसऱ्या कसोटी सामन्यात तर पहिल्याच चेंडूवर विराट कोहली बाद झाला. त्याचा फटका त्याला कसोटी रॅकिंगमध्ये बसला आहे. सध्या आयसीसी कसोटी रॅकिंगमध्ये विराट कोहलीला ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टिव्ह स्मिथनं मागे टाकले आहे.

या कारणामुळं विराटला बसला मोठा फटका

विराट कोहलीचं कसोटी क्रिकेटमध्ये दुसऱ्या क्रमांकावर येण्याचे मुख्य कारण जमैकामध्ये झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या चेंडूत बाद झाला हे आहे. पहिल्या डावात विराटनं अर्धशतक लगावले. त्यावेळी 76 धावा करत विराट बाद झाला. मात्र दुसऱ्या डावात कोहली शुन्यावर बाद झाला. त्यामुळं आयसीसीच्या ताज्या रॅकिंगनुसार विराट कोहलीचे 903 अंक आहेत. शुन्यावर बाद झाल्यामुळं विराटला 7 अंकांचा फटका बसला. तर, स्टिव्ह स्मिथचे 904 अकं आहेत.

VIDEO : दुकानाबाहेर साड्या पाहत होत्या महिला, बैलाने मागून येऊन दिली धडक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 5, 2019 11:41 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...