Home /News /sport /

MS Dhoni चा हा लूक पाहून चाहते झाले इमोशनल, PHOTO VIRAL

MS Dhoni चा हा लूक पाहून चाहते झाले इमोशनल, PHOTO VIRAL

टीम इंडिया सध्या रेट्रो जर्सी (Team India Retro Jersey) घालून मैदानात उतरत आहे. भारतीय क्रिकेट चाहत्यांनी माजी कर्णधार एमएस धोनीला (MS Dhoni) टीम इंडियाच्या या जर्सीमध्ये बघायची इच्छा अनेकवेळा बोलून दाखवली.

    मुंबई, 26 जुलै : टीम इंडिया सध्या रेट्रो जर्सी (Team India Retro Jersey) घालून मैदानात उतरत आहे. भारतीय क्रिकेट चाहत्यांनी माजी कर्णधार एमएस धोनीला (MS Dhoni) टीम इंडियाच्या या जर्सीमध्ये बघायची इच्छा अनेकवेळा बोलून दाखवली. धोनीने निवृत्ती घेतल्यानंतर टीम इंडियाची रेट्रो जर्सी लॉन्च करण्यात आली, त्यामुळे धोनीचे चाहते निराश झाले. एवढच नाही तर चाहत्यांनी फोटोशॉपचा आधार घेत धोनीला रेट्रो जर्सी घातली. आता खुद्द धोनीनेच त्याच्या चाहत्यांना सरप्राईज दिलं. सोमवारी धोनीचा टीम इंडियाची रेट्रो जर्सी घातलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. धोनीने टीम इंडियाची रेट्रो जर्सी एका जाहिरातीच्या शूटिंगसाठी घातली होती. हा फोटो पाहून धोनीच्या चाहत्यांमध्ये स्वप्न पूर्ण झाल्याची भावना होती. धोनी लवकरच क्रिकेटच्या मैदानात पुन्हा एकदा उतरणार आहे. आयपीएलच्या (IPL 2021) दुसऱ्या सत्राला 19 सप्टेंबरपासून युएईमध्ये सुरुवात होत आहे. पहिलाच सामना चेन्नई सुपरकिंग्स आणि मुंबई इंडियन्स (Chennai Super Kings vs Mumbai Indians) यांच्यात आहे. आयपीएल 2021 स्थगित होईपर्यंत धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्सची कामगिरी धमाकेदार झाली होती. 7 पैकी 5 मॅच जिंकत चेन्नई पॉईंट्स टेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे, त्यांच्या खात्यात 10 पॉईंट्स आहेत. आयपीएलच्या मागच्या मोसमात चेन्नई सुपरकिंग्सची कामगिरी निराशाजनक झाली होती. आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच चेन्नईला प्ले-ऑफमध्ये प्रवेश मिळाला नव्हता. धोनीसाठी आपल्याला आयपीएल जिंकायची आहे, असं वक्तव्य काहीच दिवसांपूर्वी सुरेश रैनाने (Suresh Raina) केलं होतं. धोनीनंतर आपणही आयपीएलला अलविदा करू, असंही रैना म्हणाला होता. आयपीएल 2021 कोरोनामुळे स्थगित झाल्यानंतर धोनी कुटुंबासोबत काही वेळ हिमाचल प्रदेशमध्ये सुट्टी एन्जॉय करत होता. हिमाचलमधल्या एका छोट्या गावात धोनी पत्नी साक्षी आणि मुलगी झिवासोबत राहिला.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Csk, Ipl, MS Dhoni, Team india

    पुढील बातम्या