नवी दिल्ली, 3 फेब्रुवारी: टीम इंडियाचा माजी यशस्वी कॅप्टन एमएस धोनी (MS Dhoni) आपली नवी इनिंग खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याने आज त्याच्या 'अथर्व: द ओरिजिन' (Atharva: The Origin) या ग्राफिक कादंबरीचा फर्स्ट लुक रिलीज केला. धोनीने स्वतः ही माहिती फेसबुकच्या माध्यामातून दिली आहे.
धोनीने आपल्या फेसबुक अकाऊंटवर ग्राफिक कादंबरीचा व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. क्रिकेटचे मैदान गाजवल्यानंतर धोनीने आता नव्या क्षेत्रात आपली नवी इनिंग खेळण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे धोनी लवकरच एका ग्राफिक नॉवेलमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या नॉवेलचा फर्स्ट लूक धोनीनं नुकताच शेअर केला आहे.
धोनीने शेअर केलेल्या फर्स्ट लूक व्हिडीओमध्ये धोनी युद्धभूमीवर अॅनिमेटेड अवतारात दिसत आहे. या व्हिडीओमध्ये धोनीचे अॅनिमेटेड पात्र राक्षसासारख्या सैन्याविरुद्ध लढताना दिसत आहे. धोनीची ही ग्राफिक कादंबरी लेखक रमेश थमिलमणी यांनी लिहिली आहे.
“नवीन काळातील ग्राफिक कादंबरी” ची घोषणा 2020 मध्ये नवीन लेखकाच्या अप्रकाशित पुस्तकाचे रूपांतर” म्हणून करण्यात आली. धोनीची पत्नी साक्षी सिंह धोनी, जी धोनी एंटरटेनमेंटची व्यवस्थापकीय संचालक आहे, तिने या मालिकेच्या निर्मितीबद्दल सांगितले. तिने याला “थ्रिलिंग सिरीज” म्हटले आहे. मात्र, धोनीच्या या नव्या इनिंगमुळे या ग्राफिक कादंबरीबद्दल त्याच्या चाहत्यांची उत्सुकता नक्कीच शिगेला पोहचली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: MS Dhoni