मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

MS Dhoni: फिफा वर्ल्ड कपमध्येही महेंद्रसिंग धोनीची हवा! पाहा जर्सी नंबर '7' ची कमाल...

MS Dhoni: फिफा वर्ल्ड कपमध्येही महेंद्रसिंग धोनीची हवा! पाहा जर्सी नंबर '7' ची कमाल...

फिफा वर्ल्ड कपमध्ये धोनीची हवा

फिफा वर्ल्ड कपमध्ये धोनीची हवा

MS Dhoni: काल मध्यरात्री पोर्तुगाल आणि उरुग्वे संघात सामना पार पडला. या सामन्यात चक्क धोनीचा एक चाहता स्टेडियममध्ये हजर होता. आणि त्यानं धोनी आणि रोनाल्डोचं एक मोठं पोस्टर सोबत आणलं होतं.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Siddhesh Kanase

दोहा-कतार, 29 नोव्हेंबर: महेंद्रसिंग धोनी हे क्रीडा विश्वातल्या सर्वात मोठ्या नावांपैकी एक नाव. केवळ भारतातच नव्हे तर इतर देशातही धोनीचा मोठा चाहता वर्ग आहे. याचं एक उदाहरण सध्या सुरु असलेल्या फिफा वर्ल्ड कपदरम्यान पाहायला मिळालं. काल मध्यरात्री पोर्तुगाल आणि उरुग्वे संघात सामना पार पडला. या सामन्यात चक्क धोनीचा एक चाहता स्टेडियममध्ये हजर होता. आणि त्यानं धोनी आणि रोनाल्डोचं एक मोठं पोस्टर सोबत आणलं होतं. महत्वाची बाब म्हणजे दोघांचा जर्सी नंबर एकच आहे. आणि त्यामुळेच या पोस्टरची चांगलीच चर्चा रंगली.

धोनीचा हा चाहता पोर्तुगालला सपोर्ट करत होता. पण त्यानं आणलेल्या पोस्टरवर रोनाल्डोसह धोनीही होता. या दोघांचा जर्सी नंबर सारखाच आहे. त्यामुळे कतारमध्ये धोनीची चांगलीच हवा झाली.

धोनीसह संजू सॅमसनचही पोस्टर

कतारमधल्या फिफा वर्ल्ड कपमध्ये ही पहिली घटना नाही जेव्हा एखाद्या चाहत्याने त्यांच्या आवडत्या क्रिकेटरचं पोस्टर आणलं होतं. काही दिवसांपूर्वी इंग्लंड आणि अमेरिका संघातल्या सामन्यादरम्यान एका चाहत्यानं संजू सॅमसनचं पोस्टर आणलं होतं.

हेही वाचा - Team India: BCCI चा नवा प्लॅन! टीम इंडियाच्या 3 सिनियर प्लेयर्सची होणार टी20तून कायमची सुट्टी?

फिफा वर्ल्ड कपची सध्या जगभरात क्रेझ आहे. पण या जागतिक स्तरावरच्या स्पर्धेदरम्यान भारतीय क्रिकेट चाहत्यांना मिळणारा पाठिंबा पाहून भारतीय चाहतेही सुखावले आहेत.

First published:

Tags: FIFA, FIFA World Cup, MS Dhoni, Sports