विराट नाही 'हा' खेळाडू सनी लिओनीचा फेवरेट

विराट नाही 'हा' खेळाडू सनी लिओनीचा फेवरेट

ICC Cricket World Cup 2019 : भारताचा कर्णधार विराट कोहलीने वेस्ट इंडिजविरुद्ध 72 धावांची खेळी केली. त्याच्या जोरावर भारताने विजय मिळवला.

  • Share this:

बई, 28 जून : ICC Cricket World Cup मध्ये भारताने विंडीजला पराभूत करून 11 गुणांसह गुणतक्त्यात दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. कर्णधार विराट कोहलीला सामनावीरचा पुरस्कार देण्यात आला. विराटने 72 धावा केल्या धोनीने नाबाद 56 धावांची खेळी केली. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात धोनीच्या संथ खेळीवरून टीका केली जात होती. तर विंडीजविरुद्धच्या खेळीनंतर त्याचं कौतुक केलं जात आहे. विराट कर्णधार असला तरी धोनी त्याला मदत करतो.

काही दिवसांपूर्वी बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनीने धोनी तिचा फेवरेट क्रिकेटपटू असल्याचं म्हटलं होतं. एका कार्यक्रमावेळी सनीला आवडता क्रिकेटपटू कोण असं विचारलं होतं. तेव्हा धोनी फेवरेट असून त्याची मुलगी खूप गोड असल्याचं सनीने म्हटलं होतं. धोनी एक फॅमिली मॅन आहे असंही सनी म्हणाली होती. धोनीचे आणि त्याच्या लाडक्या लेकीचे व्हिडिओ सोशल मिडियावर चर्चेत असतात.

View this post on Instagram

Use your Power

A post shared by M S Dhoni (@mahi7781) on

धोनीच्या संथ खेळीबद्दल सोशल मिडियावर उलट सुलट चर्चा होत आहे. अफगाणिस्तानविरुद्ध धोनी आणि केदार जाधवला धावा करता आल्या नाही म्हणून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने सिनिअर खेळाडूकडून अशा खेळीची अपेक्षा नव्हती असंही म्हटलं होतं.

वेस्ट इंडिजवर 125 धावांनी विजय मिळवल्यानंतर विराट कोहलीनं धोनी हा भारतीय संघाचा सर्वात मोठा फिनीशर असल्याचे मत व्यक्त केले आहे. सामन्यानंतर विराट कोहलीनं, "धोनीच्या अनुभवाचा आम्हाला नेहमीच फायदा होतो. जेव्हा धोनी खेळत नाही तेव्हा त्याच्यावर टीका करतात पण आम्ही सर्व त्याच्यासोबत आहोत. धोनीनं भारतीय संघाला असंख्य सामने जिंकवले आहेत", असे मत व्यक्त करत टिकाकारांना सडेतोड उत्तर दिले.

वाचा- भारताच्या विजयाने पाकिस्तान खुश, सेमीफायनलची समीकरणे बदलली

वाचा- World Cup : विराटचं ट्रम्प कार्ड, शमी म्हणजे विजयाची हमी!

वाचा- VIDEO : पाहा पांड्याचं कूल सेलिब्रेशन, विकेट मिळताच बसून वाजवल्या टाळ्या!

फुटबॉल खेळणारा हत्ती कधी पाहिलाय का? VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 28, 2019 04:44 PM IST

ताज्या बातम्या