मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /आता या शहरातही विकली जाणार धोनीच्या शेतातली भाजी

आता या शहरातही विकली जाणार धोनीच्या शेतातली भाजी

भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) निवृत्तीनंतर ऑर्गेनिक शेती करत आहे. काही महिन्यांपासून धोनीच्या शेतातल्या भाज्या रांचीच्या बाजारात विक्रीसाठी आल्या होत्या. या भाज्यांना ग्राहकांनीही पसंत केलं. आता लवकरच धोनीच्या शेतातल्या भाज्या दुबईच्या बाजारातही दिसणार आहेत.

पुढे वाचा ...

रांची, 2 जानेवारी : भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) निवृत्तीनंतर ऑर्गेनिक शेती करत आहे. काही महिन्यांपासून धोनीच्या शेतातल्या भाज्या रांचीच्या बाजारात विक्रीसाठी आल्या होत्या. या भाज्यांना ग्राहकांनीही पसंत केलं. आता लवकरच धोनीच्या शेतातल्या भाज्या दुबईच्या बाजारातही दिसणार आहेत. धोनीच्या फार्म हाऊसमधील भाज्या दुबईमध्ये नेण्यासाठीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.

आज तकमध्ये आलेल्या वृत्तानुसार झारखंडच्या कृषी विभागाने आखाती देशांमध्ये या भाज्या पाठवल्या होत्या. बाजार समितीचे पणन सचिव अभिषेक आनंद यांनी सांगितलं की 'एमएस धोनी मोठा ब्रांड आहे आणि त्याच्यासोबतच झारखंडचं नावही जोडलं गेलं आहे. याचा फायदा इथल्या शेतकऱ्यांनाही होईल. सुरुवातीला इकडे फार कोणी यायचं नाही, पण धोनीचं नाव जोडलं गेल्यामुळे आता इथल्या भाज्या परदेशातही विकल्या जातील.'

धोनीचं फार्म हाऊस 55 एकर भागात पसरलं आहे. यामध्ये स्ट्रॉबेरी, कोबी, टोमॅटो, ब्रोकोली, मटार यांची शेती केली जाते. धोनी व्यवसायात जम बसवण्यासाठी बाहेरपेक्षा कमी किंमतीला भाज्या विकत आहे. रांचीच्या फळमंडीच्या बाजूलाच याची विक्री केली जाते. धोनीच्या शेतातला कोबी 10 रुपये किलो, टोमॅटो 30 रुपये किलो विकला जात आहे. होलसेलमध्ये तर या भाज्या आणखी कमी किंमतीला विकल्या जातात.

रांचीमध्ये धोनीच्या डेयरीमधलं दूधही विकलं जात आहे. नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी लालपूरमध्ये धोनीच्या डेयरीमध्ये दूध घेण्यासाठी ग्राहकांनी गर्दी केली होती. रोज सकाळी आणि संध्याकाळी धोनीच्या फार्म हाऊसमधून लालपूरमधल्या आऊटलेटमध्ये फ्रिजन आणि साहिवाल गायीचं दूध पोहोचवलं जातं. या दुकानात रोज जवळपास 270 लीटर दूध पोहोचवलं जातं. फ्रिजन गायीचं दूध 55 रुपये आणि साहिवाल गायीचं दूध 80 रुपये प्रती लीटर विकलं जातं.

First published:
top videos