• Home
  • »
  • News
  • »
  • sport
  • »
  • लाडाची लेक! झिवाचा 'माही' बाबा सोबतचा हा Cute Photo पाहिला का?

लाडाची लेक! झिवाचा 'माही' बाबा सोबतचा हा Cute Photo पाहिला का?

भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार आणि आयपीएलमधील (IPL) चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) कर्णधार महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) उर्फ माही नेहमीच चर्चेत असतो. सध्या धोनी आपली पत्नी साक्षी (Sakshi Dhoni) आणि मुलगी झिवा (Ziva Dhoni) यांच्यासोबत शिमल्यात सुट्टीसाठी गेला आहे.

  • Share this:
शिमला, 22 जून: भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार आणि आयपीएलमधील (IPL) चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) कर्णधार महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) उर्फ माही नेहमीच चर्चेत असतो. सध्या धोनी आपली पत्नी साक्षी (Sakshi Dhoni) आणि मुलगी झिवा (Ziva Dhoni) यांच्यासोबत शिमल्यात सुट्टीसाठी गेला आहे. या ठिकाणी त्यांनी खूप फोटो काढले आहेत. साक्षीने सोशल मीडियावर तिथला एक व्हिडिओ शेअर केला होता. शिमल्यात धोनी आणि झिवा यांचा एक फोटा चेन्नई सुपर किंग्जच्या हँडलवरून ट्विट करण्यात आला आहे. या फोटोमध्ये धोनी उभा आहे आणि त्याला मिठी मारून लहानगी झिवा उभी आहे. झिवाने पिवळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. मागच्या बाजूला हिरव्यागार वनराईत चाललेला ऊन-सावलीचा खेळ दिसतोय. यात धोनीचा नवा लूक सगळ्यांना दिसतोय. त्यामुळे त्याचे फॅन्स खूश आहेत. धोनीच्या पिळदार मिशांचा हा फोटो काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्याच्या मिशांवर प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली. एकानी धोनीची तुलना रोहित शेट्टी दिग्दर्शित आणि अजय देवगण अभिनित सिंघम सिनेमातील अजयच्या लूकशी केली आहे. दुसरा म्हणतोय, ‘बघा बघा त्या मिशांकडे बघा,’ तिसरा फॅन लिहितो, ‘ वाह #Bapu तुझ्या मिशा.” दुसऱ्या फोटोमध्ये धोनीने शिमल्यातली पारंपरिक कुल्लू टोपी डोक्यावर घातली आहे. त्याचा हा फोटोही प्रचंड व्हायरल झाला आहे. लोकांनी त्यावरही प्रतिक्रिया दिल्या आहेत. साधारणपणे शिमल्याला गेलेला प्रत्येक पर्यटक ही टोपी विकत घेतो आणि फोटो काढतो.
धोनीने 15 ऑगस्ट 2020 ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतर तो आयपीएल खेळत होता. कोविडचं प्रमाण वाढल्यामुळे ही स्पर्धा अर्ध्यातच रद्द करण्यात आली तेव्हा धोनीची टीम गुणतक्त्यात दुसऱ्या स्थानी होती. या स्पर्धेतील उर्वरित मॅच या वर्षी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये युएईमध्ये होणार आहेत.
First published: