मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

US Open 2022: क्रिकेटच्या मैदानातून थेट टेनिस कोर्टवर, माहीचा अलग अंदाज

US Open 2022: क्रिकेटच्या मैदानातून थेट टेनिस कोर्टवर, माहीचा अलग अंदाज

महेंद्रसिंग धोनी यूएस ओपन सामन्याचा आनंद घेताना

महेंद्रसिंग धोनी यूएस ओपन सामन्याचा आनंद घेताना

US Open 2022: क्रिकेटचं मैदान सोडून धोनी नुकताच टेनिसच्या मैदानात दिसला. तेही चक्क यूएस ओपनमध्ये. यूएस ओपनच्या पुरुष एकेरीच्या क्वार्टर फायनल सामन्यावेळी धोनीनं हजेरी लावली.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Siddhesh Kanase

न्यूयॉर्क, 10 सप्टेंबर: टीम इंडियाच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक नाव म्हणजे महेंद्रसिंग धोनी. धोनीनं 2007 साली भारताला पहिलावहिला टी20 वर्ल्ड कप जिंकून दिला. मग 2011 साली धोनीच्या नेतृत्वात भारतानं 28 वर्षांनी वन डे विश्वचषक जिंकला. त्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफी आणि अनेक मालिकांमध्ये धोनीचं नेतृत्व उमटलं. याच धोनीनं 2020 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली. आयपीएलमध्ये मात्र धोनी अजूनही खेळतोय. दरम्यान क्रिकेटचं मैदान सोडून धोनी नुकताच टेनिसच्या मैदानातही दिसला. तेही चक्क यूएस ओपनमध्ये.

धोनीनं लुटला अमेरिकन ओपनचा आनंद

अमेरिकन ओपनमध्ये स्पेनच्या कार्लोस अलकार्ज आणि यानिक सिन्नर यांच्यात पुरुष एकेरीच्या क्वार्टर फायनलची लढत झाली. कार्लोस अलकार्जनं या लढतीत सिन्नरचा पराभव केला. गुरुवारी झालेल्या या सामन्यात टीम इंडियाचा माजी कर्णधार धोनीनंही न्यूयॉर्कच्या आर्थर अॅश स्टेडियममध्ये हजेरी लावली होती. आज यूएस ओपनच्या अधिकृत ट्विटरवरुन धोनीचा फोटो शेअर करण्यात आला. त्या फोटोला ‘भारताचा महान खेळाडू एमएस धोनी अलकार्ज आणि सिन्नर यांच्यातल्या सामन्याचा आनंद घेत आहे’ असं कॅप्शन देणात आलं आहे.

अलकार्ज-रुडमध्ये यूएस ओपन फायनल

दरम्यान यूएस ओपनच्या पुरुष एकेरीत अलकार्ज आणि नॉर्वेचा कॅस्पर रुड यांच्यात विजेतेपदासाठीची लढत होईल. रविवारी मध्यरात्री 1.30 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. महत्वाचं म्हणजे यंदाच्या यूएस ओपन फायनलमध्ये नदाल, ज्योकोविच किंवा फेडरर या महान खेळाडूंपैकी एकही खेळताना दिसणार नाही.

धोनीच सीएसकेचा कॅप्टन

महेंद्रसिंग धोनी सध्या 42 वर्षांचा आहे. पण अजूनही तो आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सचं नेतृत्व करतोय. आयपीएलच्या आगामी मोसमातही धोनीच कर्णधार असेल असं सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथ यांनी स्पष्ट केलं आहे. गेल्या मोसमात सीएसकेनं रवींद्र जाडेजाकडे कर्णधारपद सोपवलं होतं. पण काही सामन्यानंतर पुन्हा धोनीकडेच संघाची कमान देण्यात आली.

First published:

Tags: MS Dhoni, Sports