काश्मीर, 25 जुलै : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं देशसेवा करण्याच्या दिशेने एक पाऊल उचललं आहे. एकीकडे धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा होत असताना आता धोनीनं वेस्ट इंडिज दौऱ्यावर न जाता लष्करात सामिल होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी भारतीय लष्कराच्या पॅराशूट रेजिमेंटमध्ये सरावाला सुरुवात केली आहे. भारतीय लष्कराचे प्रमुख बिपीन रावत यांनी धोनीला सैन्याबरोबर सराव करण्याची परवानगी दिली आहे.
दरम्यान शुक्रवारी कारगिल दिवस निमित्त लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनी एनडीटिव्हीला दिलेल्या मुलाखतीत, "धोनीची आम्हाला काळजी घेण्याची गरज नाही. लष्करानं दिलेली कामं करण्यास तो सज्ज आहे. लवकरच जनतेचा रक्षक म्हणून तो सर्वांसमोर येईल. पण त्यासाठी काही काळ त्याला सराव करावा लागेल", असे सांगितले.
धोनी 31 जुलै ते 15 ऑगस्टपर्यंत सैन्यासोबत सराव करणार आहे. या कालावधीत धोनी 106 क्षेत्रीय सेनेसोबत राहत सराव करणार आहे. दरम्यान या अंतर्गत धोनी लष्करातील सर्वात खतरनाक असलेल्या विक्टर फोर्समध्ये ट्रेनिंग घेत आहे. यात पेट्रोलिंग गार्ड आणि पोस्ट ड्युटी या सारख्या जबाबदाऱ्या धोनी सांभाळणार असल्याची लष्करी अधिकाऱ्याची माहिती दिली.
वाचा-ऋषभ पंतला घ्यायची नाही धोनीची जागा, 'या' क्रमांकावर करणार फलंदाजी
धोनीनं केले बेसिक ट्रेनिंग पूर्ण
बिपीन रावत यांनी, "धोनीचे बेसिक ट्रेनिंग पूर्ण झाले आहे. खर तर धोनीवर आता मोठी जबाबदारी आहे. कारण तो 106 क्षेत्रीस सेनेसोबत काम करत आहे. धोनी त्याला दिलेली कामं पूर्ण करत आहे. त्यामुळं लवकरच धोनी जनतेच्या सेवेसाठी सज्ज असेल", असे सांगितले.
काश्मीरच्या खोऱ्यात पेट्रोलिंग करणार धोनी
पॅराशूट रेजिमेंटचा सदस्य असलेल्या धोनीला लष्कराने मानद लेफ्टनंट कर्नलपद दिले आहे. 2011 सालीच लष्कराने त्याला हा सन्मान दिला. याच रेजिमेंटमध्ये काश्मीरच्या खोऱ्यात धोनीची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय रायफल्स युनिटमध्ये सर्वात खतरनाक मानल्या जाणाऱ्या विक्टर फोर्स मिशनमध्ये धोनी सराव करणार आहे.
वाचा-विराट-रोहितमधील मतभेद टोकाला, हिटमॅनने अनुष्काच्या माध्यमातून असा काढला राग
2015मध्ये धोनीनं घेतले होते ट्रेनिंग
महेंद्रसिंग धोनीकडे क्षेत्रीय सेनेच्या पॅराशूट रेजिमेंटचे लेफ्टनंट कर्नलपद आहे. याअंतर्गत धोनी 2015मध्ये पॅराट्रुपरचे ट्रेनिंग घेतले होते. आग्रा येथे ट्रेनिंग धोनीनं विशेष प्रशिक्षण घेतले होते. क्रिकेटमध्ये निवृत्ती घेतल्यानंतर धोनी लष्करात सामिल होण्याची तयारी करत आहे, असे मत चाहते व्यक्त करत आहेत.
वाचा-वेस्ट इंडिजमध्ये 'हे' चार खेळाडू चालले नाही तर टीम इंडियातून होणार पत्ता कट!
पाण्यात नको ते धाडस करू नका, दुचाकीस्वार वाहून गेल्याचा थरारक VIDEO
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा