धोनीच्या निर्णयामुळं चाहत्यांना बसला शॉक, म्हणाला...

धोनीच्या निर्णयामुळं चाहत्यांना बसला शॉक, म्हणाला...

धोनीच्या पुनरागमनाबाबत अजूनही संभ्रम कायम. नक्की कधी उतरणार धोनी मैदानात?

  • Share this:

बंगळुरू, 22 सप्टेंबर : आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप होऊन आता दोन महिने झाले आहेत. यात भारतानं वेस्ट इंडिज दौरा केला, तर आता दक्षिण आफ्रिकेविरोधात मायदेशात टीम इंडिया लढत आहे. मात्र वर्ल्ड कपनंतर भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन झालेले नाही. त्यामुळं चाहत्यांच्या प्रश्न उपस्थित होत आहेत.

वर्ल्ड कप संपल्यानंतर खर तर धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा होत होत्या 38 वर्षीय धोनी निवृत्तीची घोषणा करणार असे वाटत असताना धोनीनं लष्करात ट्रेनिंग घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार धोनीनं महिनाभर काश्मीरमध्ये टेरिटोरियल आर्मीमध्ये ट्रेनिंग घेतले. त्यानंतर 15 दिवस धोनीनं लष्करासोबत कामही केले. त्यामुळं वेस्ट इंडिज दौऱ्यावर धोनीला जाता आले नाही. दरम्यान आता धोनीच्या पुनरागमनाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. धोनीनं आपल्या सुट्टीचा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेतला नाही. त्यामुळं धोनी नोव्हेंबरपर्यंत कोणताही सामना खेळणार नाही आहे.

मुंबई मिररनं दिलेल्या बातमीनुसार, धोनीनं विश्रांतीचा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं दक्षिण आफ्रिकेनंतर बांगलादेशचा संघही भारत दौऱ्यावर येणार आहे. या मालिकेत तीन टी-20 सामने होणार आहे. त्यामुळं मायदेशात होणाऱ्या या मालिकेत खेळू शकणार नाही आहे. यासगळ्यात आता धोनी निदान टी-20 वर्ल्ड कप तरी खेळणार आहे का, असा सवाल चाहते विचारत आहेत.

वाचा-INDvsSA 3rd T20 : शेवटच्या सामन्यावर आस्मानी संकट? जाणून घ्या हवामानाची स्थिती

आता थेट पुढच्या वर्षी धोनी करणार पुनरागमन?

धोनीनं क्रिकेटमधून विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे. याचा अर्थ धोनी दोन दिवसांत सुरू होणाऱ्या विजय हजारे करंडक स्पर्धेतही खेळू शकणार नाही आहे. नोव्हेंबरपर्यंत क्रिकेट खेळणार नसल्यामुळं धोनी आता थेट पुढच्या वर्षी वेस्ट इंडिजचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे, त्यावेळी पुनरागमन करू शकतो. तसेही झाले नाही तर चाहत्यांना झिम्बाम्वे आणि ऑस्ट्रेलिया विरोधात होणाऱ्या मालिकांपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

वाचा-चहल म्हणतो, मला क्रॉप का केलंस? रोहित शर्माच्या पत्नीनं दिलं 'हे' उत्तर

वर्ल्ड कपमध्ये खेळणार का धोनी

धोनीनं अखेरचा टी-20 सामना ऑस्ट्रेलियाविरोधात खेळला होता. त्यानंतर धोनीनं एकही टी-20 सामना खेळलेला नाही. त्यामुळं टी-20 वर्ल्ड कपच्या दृष्टीनं विचार केल्यास धोनीची जागा ऋषभ पंत घेऊ शकतो. पण पंतची खेळी पाहता, टीम इंडियाला धोनीसारख्या अनुभवी खेळाडूची गरज भासेल.

वाचा-पंतला मार्गदर्शनासाठी धोनी एकटाच नाही, गंभीरने सुचवला नवा पर्याय

'शरद पवारांचा कलम 370 हटवण्यास विरोध', अमित शाह म्हणतात...पाहा UNCUT VIDEO

First published: September 22, 2019, 4:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading