झिवाने अनोख्या अंदाजात केला धोनीचा मेकअप! कॅप्टन कुलच्या मेकओव्हरचा VIDEO VIRAL

झिवाने अनोख्या अंदाजात केला धोनीचा मेकअप! कॅप्टन कुलच्या मेकओव्हरचा VIDEO VIRAL

भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीनं बराच काळ क्रिकेटमधून ब्रेक घेतला आहे. आता 8 महिन्यांनंतर खेळणार IPL.

  • Share this:

नवी दिल्ली, 17 फेब्रुवारी : भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीनं बराच काळ क्रिकेटमधून ब्रेक घेतला आहे. 8 महिन्यांपासून त्याने कोणताही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, धोनी 8 महिन्यांपासून क्रिकेटपासून दूर राहिल्यानंतर 1 मार्चपासून आयपीएलच्या सरावाला सुरुवात करणार आहे.

29 मार्चपासून सुरू होणाऱ्या आयपीएल स्पर्धेत धोनी पुनरागमन करेल अशी अपेक्षा आहे. दरम्यान, शुक्रवारी धोनी (एमएस धोनी) मुंबईच्या गोरेगाव येथे दिसला. तो अ‍ॅड शुटसाठी मुंबईत दाखल झाला. दरम्यान, त्याने आपल्या मित्र सपना भवानीकडून आपला मेकओव्हर करताना दिसला. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये धोनीची लेक झिवा त्याच्या मेकअप करताना दिसत आहे.

वाचा-धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणार विराट आणि रोहित! ‘या’ दिवशी मुंबईत होणार सामना

वाचा-थाला इज बॅक! 8 महिन्यांनंतर ‘या’ संघाविरुद्ध धोनी खेळणार पहिला सामना

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये झिवा हातात ब्रश घेऊन धोनीचा मेकअप करत आहे आणि तिथे सपना भवानी उभी आहे. यावेळी धोनी खुर्चीवर बसला आहे तर झिवा त्याच्या मांडीवर बसली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच पसंत केला जात आहे. हेअरस्टाइलिस्ट सपना भवानी धोनीची खास मैत्रिणी आहे. धोनी केवळ सपनाकडूनच केस कापून घेतो.

वाचा-अखेर झाली धोनीच्या कमबॅकची घोषणा, CSKने शेअर केला खास VIDEO

धोनीनं 9 जुलै रोजी झालेल्या वर्ल्ड कप सेमीफायनल सामन्यात अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्यानंतर धोनी आपल्या कुटुंबासमवेत वेळ घालवत आहे. याआधी धोनीला बीसीसीआयच्या करार यादीतून वगळण्यात आले आहे. मात्र आता आयपीएलमध्ये धोनी कमबॅक करताना दिसणार आहे.

First published: February 17, 2020, 1:50 PM IST

ताज्या बातम्या