मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /महेंद्र सिंह धोनी 'या' दिवशी करणार IPL ला अलविदा; माजी खेळाडूने वर्तवली भविष्यवाणी

महेंद्र सिंह धोनी 'या' दिवशी करणार IPL ला अलविदा; माजी खेळाडूने वर्तवली भविष्यवाणी

आयपीएल 2021: ऑस्ट्रेलियाच्या माजी फिरकीपटू ब्रॅड हॉग (Brad hogg) यांचा असा विश्वास आहे की महेंद्रसिंग धोनी या हंगामा नंतर निवृत्ती (ms dhoni ipl retirement)जाहिर करु शकतो.

आयपीएल 2021: ऑस्ट्रेलियाच्या माजी फिरकीपटू ब्रॅड हॉग (Brad hogg) यांचा असा विश्वास आहे की महेंद्रसिंग धोनी या हंगामा नंतर निवृत्ती (ms dhoni ipl retirement)जाहिर करु शकतो.

ऑस्ट्रेलियाचे माजी (Australia Cricket Team) माजी फिरकीपटू ब्रॅड हॉग (Brad hogg) यांनी चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्र सिंह धोनी (MS Dhoni) याच्या निवृत्तीसंदर्भात भविष्यवाणी केली आहे.

नवी दिल्ली, 28 सप्टेंबर : ऑस्ट्रेलियाचे माजी (Australia Cricket Team) माजी फिरकीपटू ब्रॅड हॉग (Brad hogg) यांनी चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्र सिंह धोनी (MS Dhoni retirement news) याच्या निवृत्तीसंदर्भात भविष्यवाणी केली आहे. त्यांच्या मते 2021 हे धोनीचे  (ms dhoni ipl retirement)अखेरचे वर्ष असू शकते. त्यांच्या या वक्तव्यामुळे क्रिकेट वर्तुळात धोनी आयपीएलमधुन लवकरच निवृत्त होईल अशी चर्चा रंगली आहे.

ब्रॅड हॉग यांनी आपल्या यु-ट्युब चॅनलवर महेंद्र सिंह धोनीच्या (MS Dhoni) आयपीएलमधील निवृत्तीवर भाष्य केले आहे. "मला वाटतं एमएस धोनी आयपीएल २०२१ नंतर संन्यास घेईल. कारण गेल्या सामन्यात वरुण चक्रवर्तीच्या फिरकीवर तो ज्या पद्धतीनं बाद झाला यातूनच सारेकाही दिसून येते त्याच्या बॅट आणि पॅडमध्ये खूप जागा राहिली होती. त्यामुळे 40  वर्षीय धोनी पुढच्या आयपीएलमध्ये खेळेल असं मला वाटत नाही. असं असलं तरी त्याचं यष्टीरक्षण आजही कमाल आहे" असे मत हॉग यांनी मांडले आहे.

सौरव गांगुली यांना उच्च न्यायालयाकडून दणका, HC ने ठोठावला दंड; काय आहे प्रकरण?

चेन्नई सुपरकिंग्जचा प्रशिक्षक होण्याची शक्यता

महेंद्रसिंग धोनी याची आगामी ट्वेन्टी-२० वर्ल्डकपसाठी भारतीय क्रिकेट संघाच्या मेंटॉरपदी नियुक्ती झाली आहे. त्याच पद्धतीनं आयपीएलच्या पुढच्या सीझनमध्ये चेन्नई सुपरकिंग्जच्या व्यवस्थापकीय मंडळात महत्त्वाची भूमिका किंवा संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी दिसू शकतो, असेही हॉग म्हणाले.

तसेच, स्टीफन प्लेमिंगच्या साथीनं युवा टँलेंट शोधण्यासाठी आणि त्यांना घडविण्यासाठी धोनी येत्या काळात मोठी भूमिका पार पाडू शकतो. धोनीसारख्या शांत आणि संयमी व्यक्तिमत्त्वाची भारतीय क्रिकेटला खूप आवश्यकता आहे. त्याचा खूप मोठा फायदा युवा खेळाडूंना होईल, असेही मत हॉग यांनी व्यक्त केले आहे.

First published:
top videos

    Tags: IPL 2021, MS Dhoni