चाहत्यांसाठी मोठी बातमी, पुढच्या 48 तासांत धोनी करणार निवृत्तीची घोषणा?

चाहत्यांसाठी मोठी बातमी, पुढच्या 48 तासांत धोनी करणार निवृत्तीची घोषणा?

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड 19 जुलैला होणार आहे. त्याआधी धोनीच्या निवृत्तीवर निर्णय होऊ शकतो.

  • Share this:

मुंबई, 16 जुलै : ICC Cricket World Cupमध्ये सेमीफायनलच्या सामन्यात पराभवाचा धक्का मिळालेला भारतीय संघ ऑगस्टमध्ये वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. यासाठी भारतीय संघाची निवड 19 जुलैला होणार आहे. दरम्यान, नुकत्याच आलेल्या माहितीनुसार भारतीय संघाच्या निवडीआधी महेंद्रसिंग धोनी निवृत्ती जाहीर करू शकतो. त्यामुळं पुढच्या 48 तासांत धोनीच्या निवृत्ती संदर्भातील चित्र स्पष्ट होणार आहे. बीसीसीआयची निवड समिती यासंबधी चर्चा करणार आहे. आतापर्यंत कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही.

याआधी टाइम्स ऑफ इंडियानं दिलेल्या माहितीनुसार, वर्ल्ड कपमध्ये धोनीनं केलेल्या धिम्या फलंदाजीमुळं निवड समितीचे एमएसके प्रसाद याविषयी लवकरच त्याच्याशी यासंबंधी बोलणार आहेत, असे बीसीसीआयच्या सुत्रांनी सांगितले. दरम्यानज जर, धोनीनं निवृत्ती घेतली नाही तर, त्याला आगामी मालिकेत संघात संधी मिळणार नाही, असे संकेत बीसीसीआयच्या सुत्रांनी दिली आहे. तसेच, "आम्ही हैराण आहोत की धोनीनं याआधी असे कधीच केलेले नाही. ऋषभ पंत सारखे खेळाडू धोनीची जागा घेण्यासाठी सज्ज आहे. धोनी आता आक्रमक फलंदाज राहिलेला नाही. सहाव्या आणि सातव्या क्रमांकावरही त्याला संघर्ष करावा लगतो, त्यामुळं संघाचे नुकसान होत आहे", अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी धोनीला संघात जागा नाही?

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी धोनीची निवड करण्यात येणार नाही आहे. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये धोनीच्या फलंदाजीवर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते. सचिन तेंडुलकरनेही अफगाणिस्तान विरोधात धोनीनं केलेल्या धिम्या फलंदाजीवर टीका केली होती.

वाचा- वर्ल्ड कपमधील पराभवानंतर भारतीय संघाला 'शॉक', वेस्ट इंडिज दौऱ्याआधी मोठा फटका

धोनीच्या निवृत्तीवर लवकरच होणार निर्णय

बीसीसीआयच्या सुत्रांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीत, "वर्ल्ड कपमध्ये आम्हाला संघाचे लक्ष विचलीत करायचे नव्हते. त्यामुळं धोनीच्या निवृत्तीवर आम्ही भाष्य केले नाही. मात्र आता धोनी संदर्भात लवकरात लवकरत निर्णय घेण्यात येईल", असे सांगितले.

असा असेल वेस्ट इंडिज दौरा

भारतीय संघाचा वेस्ट इंडिज दौऱा 3 ऑगस्टपासून सुरु होत आहे. या दौऱ्यात भारतीय संघ 3 टी-20 सामने, 3 वनडे आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. दौऱ्याची सुरुवात टी-20 मालिकेने होणार आहे. त्यानंतर 8 ऑगस्टपासून वनडे तर 22 ऑगस्टला पहिला कसोटी सामना सुरू होईल. या दौऱ्यासाठी 19 जुलै रोजी भारतीय संघाची निवड होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार धोनी या दौऱ्यावर जाणार नाही. तर शिखर धवन देखील उपलब्ध असणार नाही. त्याच्या जागी मयंक अग्रवालला संघात संधी मिळू शकते.

वाचा- टी-20 वर्ल्ड कप 2020चे वेळापत्रक जाहीर, यादिवशी होणार भारताचा पहिला सामना

VIDEO : मुलांना मांडीवर घेऊन वाचवलं अन् तिने मृत्यूला कवटाळलं!

First published: July 16, 2019, 6:24 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading