मुंबई, 24 मे : एम एस धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने क्वालिफायर एकमध्ये गुजरात टायटन्सला हरवून फायनल गाठली. आतापर्यंत १२ वेळा प्लेऑफमध्ये पोहोचलेल्या चेन्नईने दहाव्यांदा फायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे. दहाही वेळा धोनीच चेन्नईचा कर्णधार होता. गतविजेत्या गुजरात टायटन्सला विजय मिळवून देण्यात हार्दिक पांड्याला अपयश आले. या सामन्यात हार्दिक पांड्यानेच धोनीचा झेल घेतला होता. तर हार्दिक पांड्या फलंदाजी करत असताना धोनीने असं काही जाळं पसरलं की त्यात पांड्या अलगद अडकला. त्याचा व्हिडीओसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
धोनीने असा सापळा रचला की हार्दिक पांड्या झेलबाद होऊन तंबूत परतला. सामन्यात हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. खेळपट्टी पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघासाठी पोषक होती तर दुसऱ्या डावात धावा करणं कठीण होतं. त्यामुळे 173 धावांचे आव्हान पार करताना गुजरातला 15 धावा कमी पडल्या.
👀 Dhoni moved a fielder to the off-side a ball prior to Hardik getting dismissed! #GTvCSK #TATAIPL #Qualifier1 #IPLonJioCinema pic.twitter.com/oJow2Vp2rj
— JioCinema (@JioCinema) May 23, 2023
चेन्नईने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना हार्दिक पांड्याने स्वत:च्या फलंदाजीचा क्रमही बदलला. तो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला. त्याची ही खेळी त्याच्याच अंगलट आली. फक्त आठ धावा करून तो बाद झाला. महेश तिक्षणाने त्याला बाद केलं. पण त्याआधी धोनीने विकेटमागे सगळी सूत्रे हलवली होती.
IPLमधून धोनी निवृत्ती घेणार? CSKने फायनलमध्ये धडक मारल्यानंतर दिलं उत्तर
पांड्या पाचव्या चेंडूवर खेळण्याआधी धोनीने क्षेत्ररक्षणात बदल केले. स्क्वेअर लेगच्या फिल्डरला तिथून कव्हर्स जवळ लावलं. हार्दिक तेव्हा ऑफ स्टम्पवर ३० यार्डच्या सर्कलवरून चेंडू फटकावण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे ऑफ साइडला धोनीने आणखी एक क्षेत्ररक्षक लावला आणि पांड्या झेलबाद झाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: IPL 2023