कर्नल महेंद्रसिंग धोनी सियाचीनमध्ये घेणार खडतर ट्रेनिंग, 'हे' आहे कारण

काश्मीरमध्ये लष्करात ट्रेनिंग घेत असलेल्या धोनीनं 73व्या स्वातंत्र्यदिनी लडाखमध्ये ध्वजारोहण केले.

News18 Lokmat | Updated On: Aug 15, 2019 06:07 PM IST

कर्नल महेंद्रसिंग धोनी सियाचीनमध्ये घेणार खडतर ट्रेनिंग, 'हे' आहे कारण

जम्मू, 15 ऑगस्ट : काश्मीरमध्ये लष्करात ट्रेनिंग घेत असलेल्या धोनीनं 73व्या स्वातंत्र्यदिनी लडाखमध्ये ध्वजारोहण केले. धोनी सध्या लष्करासोबत गार्ड ड्युटी आणि इतर कामे करत आहे. मात्र, देशभर उत्साहात 73 वा स्वांतंत्र्यदिन साजरा होत असताना धोनीचे लष्कराच्या वर्दीतले फोटो व्हायरल होत आहेत. एवढेच नाही तर धोनीनं लष्कराच्या वर्दीत लडाखमध्ये ध्वजारोहण केले. त्यानंतर लष्कराच्या अधिकाऱ्यांनी धोनीला सल्यूट करत, रहिवाशांसोबत काही काळ गप्पा गोष्टी केल्या.

धोनीचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत, यात धोनी लष्करातील सैनिकांसोबत गप्पा मारताना दिसत आहे. लेफ्टननं कर्नल धोनी यावेळी लष्कराच्या वर्दीत दिसत आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला धोनी लडाखला पोहचला होता. 2011मध्ये धोनीला लेफ्टननं कर्नल हे मानद देण्यात आले होते. त्याचबरोबर धोनी क्वालिफाईड पॅराट्रूपरही आहे.

ट्रेनिंगसाठी सियाचीन ग्लेशिअर येथे रवाना झाला धोनी

प्रसिध्द झालेल्या बातम्यानुसार, धोनीनं लडाखमध्ये तिरंगा फडकवल्यानंतर ट्रेनिंगसाठी सियाचीन ग्लेशिअर रवाना झाला आहे. धोनी आपल्या ट्रेनिंगमध्ये सियाचीन ग्लेशिअरच्या कठिण परिस्थितीत राहण्याचा अनुभव घ्यायचा आहे. त्याचबरोबर धोनी सियाचीन वॉर मेमोरियल (Siachin War Memorial) येथे शहिदांना श्रध्दांजली अर्पण करणार आहे.

वाचा-लडाखमध्ये धोनीनं फडकवला तिरंगा, केंद्रशासित प्रदेशात असे झाले स्वागत!

Loading...

आर्मी रूग्णालयातही दाखल झाला धोनी

दरम्यान लडाखमध्ये तिरंगा फडकवण्याआधी धोनी आर्मी रूग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी गेला होता. 31 जुलैला दक्षिण काश्मीरमध्ये धोनीची ट्रेनिंग सुरू झाली. दरम्यान ही ट्रेनिंग 15 ऑगस्टला समाप्त झाली. दरम्यान काही दिवसांपूर्वी धोनी लष्करातील सैन्यासोबत व्हॉलीबॉल खेळताना दिसला होता.

खतरनाक Victor Forceमध्ये जॉईन झाला होता धोनी

80च्या दशकात राष्ट्रीय रायफल्सच्या कॅम्पमध्ये दहशतवादी हल्ल्यांचे प्रमाण वाढले होते. त्यामुळं उत्तर-पूर्व राज्यातील दहशतवादी हल्ल्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी 1990मध्ये राष्ट्रीय रायफ्सल फोर्सची स्थापना करण्यात आली. दहशतवादावर नियंत्रण मिळवण्यासाठी राष्ट्रीय रायफल्स विभागाची पाच युनिटमध्ये विभागणी करण्यात आली होती. यात रोमियो फोर्स, डेल्टा फोर्स, व्हिक्टर फोर्स, किलो फोर्स आणि युनिफॉर्म फोर्स यांचा समावेश आहे. काश्मीच्या घाट परिसरात व्हिक्टर फोर्सची नियुक्ती केली जाते.

वाचा-धोनी सीमेवर तर झिवा म्हणते,'देश का सिपाही हूं'; VIDEO होतोय व्हायरल

निवृत्तीनंतर जाणार लष्करात?

महेंद्रसिंग धोनीकडे क्षेत्रीय सेनेच्या पॅराशूट रेजिमेंटचे लेफ्टनंट कर्नलपद आहे. याअंतर्गत धोनी 2015मध्ये पॅराट्रुपरचे ट्रेनिंग घेतले होते. आग्रा येथे ट्रेनिंग धोनीनं विशेष प्रशिक्षण घेतले होते. क्रिकेटमध्ये निवृत्ती घेतल्यानंतर धोनी लष्करात सामिल होण्याची तयारी करत आहे, असे मत चाहते व्यक्त करत आहेत.

वाचा-IPLचा चॅम्पियन खेळाडू आता होणार शाहरूखच्या संघाचा नवा कोच!

बा विठ्ठला जय हिंद, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 15, 2019 06:07 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...