लडाखमध्ये धोनीनं फडकवला तिरंगा, केंद्रशासित प्रदेशात असे झाले स्वागत!

लडाखमध्ये धोनीनं फडकवला तिरंगा, केंद्रशासित प्रदेशात असे झाले स्वागत!

देशभर उत्साहात 73 वा स्वांतंत्र्यदिन साजरा होत असताना धोनीचे लष्कराच्या वर्दीतले फोटो व्हायरल होत आहेत.

  • Share this:

लेह, 15 ऑगस्ट : भारताचा स्टार खेळाडू एमएस धोनी वर्ल्ड कपनंतर क्रिकेटपासून लांब आहे. धोनी सध्या जम्मू-काश्मीरमध्ये लष्कारासोबत ट्रेनिंग घेत आहे. धोनी सध्या लष्करासोबत गार्ड ड्युटी आणि इतर कामे करत आहे. मात्र, देशभर उत्साहात 73 वा स्वांतंत्र्यदिन साजरा होत असताना धोनीचे लष्कराच्या वर्दीतले फोटो व्हायरल होत आहेत. एवढेच नाही तर धोनीनं लष्कराच्या वर्दीत लडाखमध्ये ध्वजारोहण केले. त्यानंतर लष्कराच्या अधिकाऱ्यांनी धोनीला सल्यूट करत, रहिवाशांसोबत काही काळ गप्पा गोष्टी केल्या.

धोनीचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत, यात धोनी लष्करातील सैनिकांसोबत गप्पा मारताना दिसत आहे. लेफ्टननं कर्नल धोनी यावेळी लष्कराच्या वर्दीत दिसत आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला धोनी लडाखला पोहचला होता. 2011मध्ये धोनीला लेफ्टननं कर्नल हे मानद देण्यात आले होते. त्याचबरोबर धोनी क्वालिफाईड पॅराट्रूपरही आहे.

वाचा-जवानापेक्षा कमी नाही धोनीचा जोश! गंभीर दुखापतीतही सीमेवर करतोय देशाचे संरक्षण

झिवाचाही व्हिडिओ व्हायरल

झिवाच्या शाळेत स्वातंत्र्यदिनानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये सर्व मुलांनी वेगवेगळ्या वेशभुषा केल्या होत्या. झिवानं झाशीच्या राणीची वेशभुषा केली होती. हातात तलावर आणि ढाल घेऊन चिमुकली झिवा कार्यक्रमात सहभागी झाली होती. इतर मुलांमध्ये कोणी महात्मा गांधी झाले होते तर कोणी जवाहरलाल नेहरू झाले होते.

धोनीला झाली होती गंभीर दुखापत

भारतीय संघाचा स्टार खेळाडू महेंद्रसिंग धोनीचा वर्ल्ड कप 2019 दरम्यान इंग्लंड विरोधात झालेल्या सामन्यात एक फोटो व्हायरल झाला होता. ज्यात धोनीच्या बोटाला गंभीर दुखापत झाल्यामुळं त्याच्या अंगठ्यातून रक्तस्राव होत होता. मात्र, आता सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वर्ल्ड कपमध्ये धोनीला फक्त अंगठ्याला दुखापत झालेली नव्हती, तर बोटालाही दुखापत झाली होती. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धोनीला वर्ल्ड कपमध्य गंभीर दुखापत झाली होती.

ट्रेनिंगसाठी धोनीनं लपवली ती गोष्ट

धोनीनं सैन्यात जाण्यासाठी ही गोष्ट लपवली असली तर, सैन्यालाही याबाबत माहिती दिली नाही. धोनीकडे टेरिटोरिय आर्मीचे लेफ्टनंन कर्नलचे मानद असल्यामुळं तो सध्या काश्मीरमध्ये व्हिक्टर फोर्समध्ये ट्रेनिंग घेत आहे. दरम्यान 15 ऑगस्टला धोनी लेहमध्ये ध्वजवंदन करणार असल्याच्याही बातम्या आहेत.

वाचा-धोनी सीमेवर तर झिवा म्हणते,'देश का सिपाही हूं'; VIDEO होतोय व्हायरल

खतरनाक Victor Forceमध्ये जॉईन झाला धोनी

80च्या दशकात राष्ट्रीय रायफल्सच्या कॅम्पमध्ये दहशतवादी हल्ल्यांचे प्रमाण वाढले होते. त्यामुळं उत्तर-पूर्व राज्यातील दहशतवादी हल्ल्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी 1990मध्ये राष्ट्रीय रायफ्सल फोर्सची स्थापना करण्यात आली. दहशतवादावर नियंत्रण मिळवण्यासाठी राष्ट्रीय रायफल्स विभागाची पाच युनिटमध्ये विभागणी करण्यात आली होती. यात रोमियो फोर्स, डेल्टा फोर्स, व्हिक्टर फोर्स, किलो फोर्स आणि युनिफॉर्म फोर्स यांचा समावेश आहे. काश्मीच्या घाट परिसरात व्हिक्टर फोर्सची नियुक्ती केली जाते.

निवृत्तीनंतर धोनी जाणार लष्करात?

महेंद्रसिंग धोनीकडे क्षेत्रीय सेनेच्या पॅराशूट रेजिमेंटचे लेफ्टनंट कर्नलपद आहे. याअंतर्गत धोनी 2015मध्ये पॅराट्रुपरचे ट्रेनिंग घेतले होते. आग्रा येथे ट्रेनिंग धोनीनं विशेष प्रशिक्षण घेतले होते. क्रिकेटमध्ये निवृत्ती घेतल्यानंतर धोनी लष्करात सामिल होण्याची तयारी करत आहे, असे मत चाहते व्यक्त करत आहेत.

वाचा-स्वातंत्र्यानंतर 72 वर्षांत टीम इंडियानं पहिल्यांदाच केली ही कामगिरी

VIDEO : स्वातंत्रदिनी ऐका संत तुकडोजी महाराजांनी लिहिलेली राष्ट्रवंदना

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 15, 2019 04:24 PM IST

ताज्या बातम्या