मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

'असं कोण बर्थडे विश करतं?', धोनीच्या वाढदिवसाला श्रीसंतच्या जगावेगळ्या शुभेच्छा!

भारताचा माजी क्रिकेटपटू एमएस धोनीचा (MS Dhoni Birthday) काल म्हणजेच 7 जुलैला वाढदिवस झाला. धोनीच्या चाहत्यांसोबतच विराट कोहली, सचिन तेंडुलकर यांच्यासारख्या महान क्रिकेटपटूंनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून धोनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पण भारताचा माजी फास्ट बॉलर एस.श्रीसंत (S Sreesanth) यांनी दिलेल्या शुभेच्छांमुळे त्यालाच ट्रोल व्हायची वेळ येत आहे.

पुढे वाचा ...
  मुंबई, 8 जुलै : भारताचा माजी क्रिकेटपटू एमएस धोनीचा (MS Dhoni Birthday) काल म्हणजेच 7 जुलैला वाढदिवस झाला. धोनीच्या चाहत्यांसोबतच विराट कोहली, सचिन तेंडुलकर यांच्यासारख्या महान क्रिकेटपटूंनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून धोनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पण भारताचा माजी फास्ट बॉलर एस.श्रीसंत (S Sreesanth) यांनी दिलेल्या शुभेच्छांमुळे त्यालाच ट्रोल व्हायची वेळ येत आहे. श्रीसंतने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला, यामध्ये तो धोनीला बोल्ड करत आहे. आयपीएलमध्ये पंजाबकडून बॉलिंग करत असतानाचा श्रीसंतचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये श्रीसंत यॉर्करवर धोनीला बोल्ड करतो आणि जोरदार सेलिब्रेशन करताना दाखण्यात आला आहे. 'माझा मोठा भाऊ धोनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा. धोनीने कायमच मला पुढे जाण्याची प्रेरणा दिली आहे. लव्ह यू ब्रो. माझ्या आयुष्यातल्या सर्वोत्तम बॉलवर मी तुझी विकेट घेतली, हा माझ्यासाठी सन्मान आहे,' असं श्रीसंत म्हणाला.
  चाहत्यांनी मात्र श्रीसंतच्या या शुभेच्छांवर निशाणा साधला. अशा शुभेच्छा कोण देतं? असं एका चाहत्याने विचारलं, तर विश ऑफ द डे, अशी कमेंट एकाने केली. स्वत:ला शुभेच्छा देत आहेस का धोनीला? असा प्रश्नही एका यूजरने विचारला.
  Published by:Shreyas
  First published:

  Tags: MS Dhoni

  पुढील बातम्या