तब्बल 128 दिवसांनी धोनीनं हातात घेतली बॅट, चाहत्यांनो तुफान बॅटिंगचा VIDEO मिस करू नका

तब्बल 128 दिवसांनी धोनीनं हातात घेतली बॅट, चाहत्यांनो तुफान बॅटिंगचा VIDEO मिस करू नका

लवकरच धोनी करणार क्रिकेटमध्ये कमबॅक. धोनीनं सुरू केला सराव.

  • Share this:

रांची, 15 नोव्हेंबर : भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी दोन-तीन महिने क्रिकेटपासून लांब आहे. धोनीनं इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंड विरोधात अखेरचा सामना खेळला होता. त्यानंतर धोनी फक्त क्रिकेटच्या मैदानावर दिसला पण त्यानं बॅट हातात घेतली नाही.

महेंद्रसिंग धोनी वर्ल्ड कपनंतर निवृत्ती घेणार अशा चर्चा असताना, त्यानं विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश विरोधात त्यानं खेळण्याचा निर्णय घेतला नाही. दरम्यान धोनीनं पुन्हा एका क्रिकेट सरावाला सुरुवात कली आहे. झारखंड क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर धोनीनं सराव केला, त्यामुळं वेस्ट इंडिज विरोधात धोनी मैदानात उतरेल अशी अपेक्षा आहे. भारत-वेस्ट इंडिज यांच्यात 3 डिसेंबरपासून टी-20 मालिका होणार आहे. धोनीचा बॅटिंग करतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

वाचा-‘संकटमोचक’ मुंबईकरालाच रोहितनं दिला डच्चू, 4 वर्षात फक्त एकदा दिली संधी

क्रिकेटमधून विश्रांती घेतल्यानंतर धोनी स्नुकर आणि टेनिस खेळताना दिसला. आज क्रिकेटचा सराव करण्याआधी धोनीनं एक दिवस आधी लॉन टेनिस खेळण्याचा आनंद लुटला होता. धोनीच्या बॅटिंग प्रॅक्टिसचा व्हिडीओ त्याच्या चाहत्यांनी पोस्ट केला आहे. दरम्यान, धोनीला पुन्हा मैदानावर पाहणे ही चाहत्यांसाठी एक पर्वणी असणार आहे. टी-20 वर्ल्ड कप खेळण्यासाठी धोनी सज्ज असल्यामुळं त्याआधी तो मालिका खेळू शकतो.

वाचा-गांगुलीच्या राज्यात द्रविडला मिळाला न्याय, BCCIनं दिली क्लीन चिट

वाचा-मयंक अग्रवाल नॉनस्टॉप! विराटलाही नाही जमलं त्या खेळाडूशी घेतला पंगा

जानेवारीमध्ये धोनी करणार कमबॅक?

जानेवारीमध्ये महेंद्रसिंग धोनी प्रतिस्पर्धात्मक क्रिकेटमध्ये कमबॅक करणार आहे. भारत-दक्षिण आफ्रिका दौऱ्यात झालेल्या कसोटी सामन्यात रांची येथे धोनी उपस्थित होता. दरम्यान एक्सप्रेसनं दिलेल्या माहितीनुसार धोनी सैयद मुश्ताफ अली ट्रॉफीमध्ये खेळणार आहे. झारखंड संघाकडून कमबॅक करण्यासाठी धोनीनं ट्रेनिंगला सुरुवात केली आहे. जानेवारी 2020मध्ये धोनी सैयद अली स्पर्धेत खेळण्यास सुरुवात करणार आहे. झारखंडच्या वरिष्ठ संघात धोनी पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहे. यासाठी धोनी आतापासून राज्य अंडर-23 संघाकडून अभ्यास वर्गाला सुरुवात केली आहे.

Tags:
First Published: Nov 15, 2019 03:17 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading