S M L

धोनीचा 'पद्मभूषण'ने सन्मान, याच दिवशी जिंकला होता वर्ल्डकप !

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

Sachin Salve | Updated On: Apr 3, 2018 07:32 AM IST

धोनीचा 'पद्मभूषण'ने सन्मान, याच दिवशी जिंकला होता वर्ल्डकप !

नवी दिल्ली, 03 एप्रिल : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. लेफ्टनंट कर्नल हे मानद पद भूषवणाऱ्या धोनीने लष्कराच्या गणवेषात हा सन्मान स्वीकारला.

विशेष म्हणजे सात वर्षांपूर्वी २०११ मध्ये २ एप्रिल रोजीच धोनीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने श्रीलंकेचा पराभव करून क्रिकेट वर्ल्डकप जिंकला होता. त्यामुळे 2 एप्रिलच्या दिवशी झालेला सन्मान धोनीचा आनंद द्विगुणित करणारा ठरला.

सोमवारी एकूण 41 जणांना पद्म पुरस्कारानं गौरवण्यात आलं. धोनीसोबतच बिलीयर्ड खेळाडू पंकज अडवानी याचाही पद्म भूषण पुरस्काराने गौरव करण्यात आला. यावेळी अभिनेते मनोज जोशी यांनाही पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 3, 2018 07:30 AM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close