मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

लंडनच्या रस्त्यावर फिरणं धोनीला पडलं महागात, बचावासाठी घ्यावी लागली सुरक्षा रक्षकांची मदत, VIDEO

लंडनच्या रस्त्यावर फिरणं धोनीला पडलं महागात, बचावासाठी घ्यावी लागली सुरक्षा रक्षकांची मदत, VIDEO

टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनीचे (MS Dhoni) चाहते फक्त भारतातच नाही तर भारताबाहेरही आहेत. धोनीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • Published by:  Shreyas
लंडन, 16 जुलै : टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनीचे (MS Dhoni) चाहते फक्त भारतातच नाही तर भारताबाहेरही आहेत. धोनीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये धोनी लंडनच्या रस्त्यावर मास्क लावून फिरताना दिसत आहे. धोनीने मास्क लावला असला तरी रस्त्यावरच्या नागरिकांनी त्याला सहज ओळखलं, यानंतर चाहत्यांनी धोनीसोबत सेल्फी घेण्यासाठी गर्दी केली. चाहत्यांची गर्दी पाहून धोनीच्या मदतीला सुरक्षा रक्षक आले. सुरक्षा रक्षकांच्या मदतीने धोनी गर्दीतून रस्ता काढत धोनी गाडीमध्ये बसला. चाहत्यांच्या गर्दीमध्ये धोनीच्या हातात असलेली बॅगही खाली पडली. सुरक्षा रक्षकांच्या मदतीने गाडीमध्ये बसल्यानंतर धोनीने मास्क काढला आणि चाहत्यांचं अभिवादन स्वीकारलं. धोनीची झलक पाहून लंडनच्या रस्त्यावरचे त्याचे फॅन्सही खूश झाले. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला. भारत आणि इंग्लंड यांच्यात लॉर्ड्सवर झालेली दुसरी वनडे बघण्यासाठी धोनी आला होता. मॅच बघण्यासाठी धोनीबरोबर टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाही होता. या दोघांशिवाय हरभजन सिंग, सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली हे दिग्गज देखील मॅच बघण्यासाठी लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर आले होते.
First published:

Tags: MS Dhoni

पुढील बातम्या