फक्त MS Dhoni नव्हे, तर पत्नी साक्षीलाही सामावून घेण्यास भाजप उत्सुक; 2024 निवडणुकीसाठी साक्षी धोनीला देणार तिकीट?

फक्त MS Dhoni नव्हे, तर पत्नी साक्षीलाही सामावून घेण्यास भाजप उत्सुक; 2024 निवडणुकीसाठी साक्षी धोनीला देणार तिकीट?

माहीने (MS Dhoni) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेतल्यानंतर आता चर्चा फक्त त्याच्या भाजप पक्षप्रवेशापर्यंत थांबलेली नाही, तर पत्नीला पुढच्या लोकसभेचं तिकिट देण्याचीही वदंता आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 25 ऑगस्ट : कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर आता तो राजकारणात जाणार का याविषयी चर्चा सुरू झाल्या आहेत. धोनीला सामावून भारतीय जनता पक्षाने पहिल्यापासूनच रस दाखवला आहे. 2019 मध्ये पक्षाचा स्टार प्रचारक म्हणून धोनीला नेमण्यास भाजप उत्सुक होता. पण त्या वेळी धोनीने त्याला नकार दर्शवला होता.

आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेतल्यानंतर धोनीच्या भाजप प्रवेशाची चर्चा नव्याने सुरू झाली आहे. धोनीने राजकारणात प्रवेश केला, तर तो कुठल्या राज्यात सक्रिय राहील याचीही चर्चा झाली. धोनी कुटुंबीय मूळचे उत्तराखंडचे आहे. पण माही झारखंडलाच वाढला आणि मोठा झाला. सध्याही तो रांचीचा सुपुत्र म्हणूनच ओळखला जातो. त्यामुळे रांचीतूनच तो राजकारणाचा श्रीगणेशा करेल, असं बोललं जातं.

पंजाब केसरीने तर यापुढचं वृत्त दिलं आहे. फक्त धोनीच नाही तर त्याची पत्नी साक्षी धोनीला तिकिट देण्यास भाजप उत्सुक असल्याचं या वृत्तात म्हटलं आहे. अर्थात याविषयी कुठल्याही नेत्याने, पक्षाने किंवा खुद्द धोनीने कुठलीही अधिकृत घोषणा केलेली नाही. या फक्त शक्यता आहेत आणि चर्चा आहेत.

भाजपने यापूर्वी गौतम गंभीर, राज्यवर्धन राठोड, बबिता फोगट अशा अनेक खेळाडूंना पक्षातर्फे निवडणुकीत उभं केलं. अनेकांना पदं आणि खातीसुद्धा दिली. त्यामुळे धोनी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या अफवा पसरल्या आहेत.

Published by: अरुंधती रानडे जोशी
First published: August 25, 2020, 4:06 PM IST

ताज्या बातम्या