आगीत होरपळलेल्या ऑस्ट्रेलियासाठी सचिन-धोनी घेणार पुढाकार! वाचून तुम्हीही कराल सलाम

आगीत होरपळलेल्या ऑस्ट्रेलियासाठी सचिन-धोनी घेणार पुढाकार! वाचून तुम्हीही कराल सलाम

ऑस्ट्रेलियातील आगीच्या मदतकार्यासाठी धोनी आणि सचिन यांसह अनेक दिग्गज खेळाडू पुढे आले आहेत.

  • Share this:

मुंबई, 13 जानेवारी : गतवर्षी अॅमेझॉन जंगलाला लागलेल्या आगीनंतर आता ऑस्ट्रेलियातील जंगलात भीषण आग लागली आहे. आतापर्यंतची ही सर्वात मोठी आग आहे. गेल्या 4 महिन्यांपासून ही आग धगधगत आहे. या आगीनं आतापर्यंत 50 कोटीहून अधिक प्राण्यांचा जीव घेतला आहे. अखेर अचानक पडलेल्या पावसामुळं ही आग नियंत्रणात आणण्यात सरकारला यश आले. मात्र ऑस्ट्रेलियातील जीवन पुर्वपदावर येण्यासाठी जगभरातून मदतीचा हाक दिली जात आहे. दरम्यान, या मदतकार्यासाठी भारताचे दोन दिग्गज खेळाडू पुढे आले आहेत.

लोकांच्या पुनर्वसनासाठी ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू शेन वॉर्नने मदतकार्यासाठी Bushfire Cricket Leagueचे आयोजन केले आहे. वॉर्न आणि रिकी पाँटींग हे दोन ऑस्ट्रेलियन खेळाडू संघांचं प्रतिनिधीत्व करणार आहेत. या सामन्यात खेळण्यासाठी माजी भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि सध्या संघाबाहेर असलेल्या महेंद्रसिंह धोनीलाही विचारण्यात आलेले आहे.

वाचा-वनडेतूनही ऋषभ पंतचा पत्ता कट? विराट आपल्या हुकुमी एक्क्याला देणार संधी

द गार्डियन या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत वॉर्नने, “मला अपेक्षा आहे की आणखी खेळाडू यात सामील होतील. संगीत, खेळ, चित्रपट यासारख्या सर्व क्षेत्रातील मोठ्या लोकांना या कार्यात सहभागी व्हावं यासाठी प्रयत्न चालू आहेत.”, असे सांगितले. याआधी शेन वॉर्ननं ऑस्ट्रेलियातील मदतकार्यासाठी आपल्या आवडच्या टोपीचा लिलाव केला होता. याआधी बिग बॅश लीगमधील खेळाडूंनी प्रत्येक सिक्समागे 5 हजार देण्याचे जाहीर केले होते.

वाचा-LIVE सामन्यात अम्पायरला ‘याडं लागलं’, पाहा हा भन्नाट VIDEO

दरम्यान, Bushfire Cricket League हा सामना बिग बॅश लीग या स्पर्धेच्या अंतिम सामन्याआधी आयोजित करण्यात आला आहे. 8 फेब्रुवारी रोजी बिग बॅश लीग स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाईल. त्याआधी किंवा त्यानंतर ही स्पर्धा होणार आहे.

वाचा-पहिल्या वनडेआधी विराटचे धक्कादायक वक्तव्य, शिखर-राहुलसाठी सोडणार स्वत:चे स्थान?

ऑस्ट्रेलियात भीषण आग

ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्स स्टेटमध्ये पहिल्यांदा आग लागली. राजधानी मेलबर्न आणि सिडनी याच राज्यात समुद्र किनाऱ्यावर आहेत. इथं 70 लाख लोक राहतात. वेल्सनंतर आग विक्टोरियापर्यंत पोहचली. गेल्या आठवड्यात मल्लकूटातील जंगलाला आगा लागली. यामुळे शहरातील 4 हजार लोकांना स्थलांतर करावं लागलं. जवळपास 1.23 कोटी एकर क्षेत्र आगीत भस्मसाथ झालं आहे. सिडनीच्या ओपेरा हाऊसपेक्षाही आगीचे लोट उंच असल्याचं म्हटलं जात आहे. ही आग विझवण्यासाठी 74 हजार कर्मचारी काम करत आहेत. आगीत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी हेलिकॉप्टरची मदत घेतली जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 13, 2020 08:01 PM IST

ताज्या बातम्या