Home /News /sport /

देर आए दुरुस्त आए! 28 व्या वर्षी रणजी पदार्पणातच रचला इतिहास, पाहा VIDEO

देर आए दुरुस्त आए! 28 व्या वर्षी रणजी पदार्पणातच रचला इतिहास, पाहा VIDEO

मध्यप्रदेशचा क्रिकेटपटू रवि यादवने रणजीमध्ये पदार्पणातच धमाल उडवली असून इतिहास रचला आहे.

    इंदौर, 28 जानेवारी : मध्यप्रदेशचा क्रिकेटपटू रवि यादवने गोलंदाजी कमाल करताना ऐतिहासिक कामगिरी केली आहे. त्याने सोमवारी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पणाच्या सामन्यात पहिल्याच षट्कात हॅट्ट्रिक केली आहे. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच गोलंदाज ठरला आहे. रवि यादव रणजी ट्रॉफीमध्ये उत्तर प्रदेश विरुद्ध त्याने कमाल केली. मूळचा उत्तर प्रदेशचा असलेल्या रविने इंदौरमधील होळकर क्रिकेट स्टेडियममध्ये हॅट्ट्रिक नोंदवली. त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत अनेकदा दुखापतीचा सामना करावा लागल्याने वयाच्या 28 व्या वर्षी रणजीमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. गोलंदाजीला येताच त्याने सलग तीन चेंडूवर आर्यन जुयाल, अंकित राजपूत आणि समीर रिझवी यांना बाद केलं. बीसीसीआयने त्याच्या या कामगिरीचा व्हिडिओ ट्विटरवरून शेअर केला आहे. रविने जुयालला यष्टीरक्षक अजयकडे झेल देण्यास भाग पाडलं. त्याने पहिल्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर जुयालला बाद केलं. त्यानंतर राजपूत आणि रिझवी यांचा त्रिफळा उडवला. दुसऱ्या दिवशी रवि यादवने आणखी दोन गडी बाद केले. त्याने सामन्यात 61 धावा देत 5 गडी बाद केले. याच्या जोरावर मध्यप्रदेशने पहिल्या डावात 14 धावांची आघाडी घेतली आहे. वनडेमध्ये धमाका! 48 षटकार आणि 70 चौकारासह फलंदाजांनी चोपल्या 818 धावा अरे देवा! बुमराहशी बोलण्यासाठी खेळाडूंना द्यावे लागतात 50 लाख?
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: Cricket

    पुढील बातम्या