मुंबई, 30 मे : वेगाचा खेळ थरारक आणि रोमांचक असतो, पण तो तेवढाच धोकादायकही असतो. कितीही सुरक्षा उपकरणांचा वापर केला, तरीही अनेक अपघात जीवघेणेही ठरतात. अशाचप्रकारचा एक अपघात इटालियन ग्रां प्री (Italian GP) च्या मोटो 3 ड्रायव्हर जेसन डुपास्कियर (Jason Dupasquier) सोबत झाला. या अपघातात जेसन याचा मृत्यू झाला आहे. जेसन डुपास्कियर फक्त 19 वर्षांचा होता.
स्वित्झर्लंडचा MOTO 3 बाईक रायडर डुपास्कियर इटलीच्या ट्रॅकवर आपल्या प्रतिस्पर्ध्याच्या पुढे जायचा प्रयत्न करत होता, तेव्हा हा अपघात झाला. इटालियन ग्रां प्री च्या क्वालिफायिंग राऊंडमध्ये डुपास्कियरचा बाईकवरचा तोल सुटला, तेव्हाच आणखी दोन रायडर आणि त्यांच्या बाईकने एकमेकांना टक्कर दिली, यानंतर ट्रॅकवर गंभीर परिस्थिती ओढावली.
अपघातानंतर दुसरा रायडर स्वत:ला वाचवण्यात यशस्वी ठरले, पण डुपास्कियरला जीव गमवावा लागला. स्वित्झर्लंडच्या या रायडरला वाचवण्याचा भरपूर प्रयत्न करण्यात आला. सुरुवातीचा अर्धा तास त्याच्यावर ट्रॅकवरच वैद्यकीय उपचार करण्यात आले, यानंतर विशेष हेलिकॉप्टरने त्याला रुग्णालयात नेण्यात आलं, तिकडे त्याचा मृत्यू झाला.
We’re deeply saddened to report the loss of Jason Dupasquier On behalf of the entire MotoGP family, we send our love to his team, his family and loved ones You will be sorely missed, Jason. Ride in peace pic.twitter.com/nZCzlmJsVi
— MotoGP™🏁 (@MotoGP) May 30, 2021
'डुपास्कियरचा अपघात गंभीर होता, जेव्हा तो रुग्णालयात आला तेव्हा त्याची प्रकृती चिंताजनक होती,' असं रुग्णालयाने सांगितलं. इटालियन ग्रां प्री च्या ट्रॅकवर झालेल्या या अपघातात सासाकी आणि अल्कोबा यांनाही दुखापत झाली, पण त्यांना गंभीर इजा झाली नाही.
डुपास्कियरच्या मृत्यूनंतर इटालियन ग्रां प्रीचे रायडर आणि कर्मचाऱ्यांनी त्याला ट्रॅकवरच उभं राहून श्रद्धांजली वाहिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.