मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच, आई-मुलाने केलं असं काम...

क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच, आई-मुलाने केलं असं काम...

पुरुषांच्या क्रिकेट क्लबमध्ये महिला, ऐकून तुम्हाला ही गोष्ट वेगळी दिसेल आणि आश्चर्यही वाटेल, पण आई आणि मुलाने एका क्लबकडून ओपनिंगला बॅटिंग केली आहे.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 24 मे : पुरुषांच्या क्रिकेट क्लबमध्ये महिला, ऐकून तुम्हाला ही गोष्ट वेगळी दिसेल आणि आश्चर्यही वाटेल, पण आई आणि मुलाने एका क्लबकडून ओपनिंगला बॅटिंग केली आहे. इंग्लंडच्या क्लब क्रिकेटमध्ये (England Cricket Club) ही घटना घडली आहे. इंग्लंडची माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू एरेन ब्रिंडल (Aren Brindal) आपला 12 वर्षांचा मुलगा हॅरीसोबत ओपनिंगला आली, एवढच नाही तर या दोघांनी नाबाद शतकी पार्टनरशीप करून टीमला विजय मिळवून दिला.

ओम्बी सीसी ट्रोजन्सकडून खेळताना ब्रिंडन आणि हॅरी यांनी नेतलहम क्रिकेट ऍकेडमी-11 विरुद्ध टीमला विजय मिळवून दिला. एरेनने अर्धशतकी खेळी केली. या दोघांमध्ये 143 रनची पार्टनरशीपही झाली. एरेन ब्रिंडलने इंग्लंडकडून 134 आंतरराष्ट्रीय मॅचमध्ये 2,852 रन केले. तिने लागोपाठ तीन ऍशेस सीरिजही जिंकल्या, पण मुलासोबत शतकी पार्टनरशीप करून तिने नवा किर्तीमान रचला.

एरेन ब्रिंडन 19 वर्ष 260 दिवसांची असताना वनडे टीमची कर्णधार झाली होती. महिला क्रिकेटपटू म्हणून हेदेखील एक रेकॉर्ड आहे. तिने 2005 साली ऍशेस जिंकवण्यात मोलाची भूमिका बजावली होती. त्यामुळे इंग्लिश टीम 42 वर्षांनंतर ऍशेस जिंकली होती. आपल्या पहिल्या टेस्ट शतकाच्या जोरावर तिने पहिली टेस्ट ड्रॉ केली, यानंतर दुसऱ्या टेस्टमध्ये विजयी रन काढताना ती क्रीजवर होती.

39 वर्षांची एरेन आई बनल्यानंतर 2005 ते 2011 पर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून लांब होती, पण ती क्लब क्रिकेटमध्ये ती खेळतच होती. पुरुषांच्या प्रीमियर लीग क्रिकेटमध्ये शतक करणारी ती पहिली महिला क्रिकेटपटू होती. फेब्रुवारी 2014 साली तिने संन्यास घेतला. ऑलराऊंडर असलेल्या एरेनने 11 टेस्टमध्ये 551 रन केले, तर 88 वनडेमध्ये तिने 1,928 रन आणि 35 विकेट मिळवल्या. 35 टी-20 मध्ये एरेनला 373 रन करून 22 विकेट घेता आल्या.

First published:

Tags: Cricket, England