मुंबई, 12 ऑगस्ट : मॅच सुरू असताना (Live Match) एखादा फॅन, प्राणी किंवा पक्षी मैदानात शिरल्याची घटना नवी नाही. मैदानात शिरलेल्या या आगंतुकांना पकडण्यासाठी सुरक्षा कर्मचाऱ्यांना चांगलीच धावपळ करावी लागते. मात्र सध्या एक गोड व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Video Viral) झाली आहे. या व्हिडीओत Live मॅचच्या दरम्यान दोन वर्षांचा मुलगा मैदानात घुसला. त्याला पकडण्यासाठी त्याच्या आईला मैदानात चांगलीच धावपळ करावी लागली.
अमेरिकेतील ओहियोमधील एका फुटबॉल मॅचच्या दरम्यान ही घटना घडली आहे. एफसी सिनसिनाटी आणि ओरलँडो सिटी यांच्यातील मॅचच्या दरम्यान एक लहान बाळ अचानक मैदानात पळत आले. त्याला पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. ते बाळ अगदी वेगानं मैदानाच्या मध्यभागापर्यंत पळत पोहचले.
या बाळाला पकडण्यासाठी त्याच्या आईनंही मैदानात धाव घेतली. आईला पाहून बाळ आणखीच जोरानं पळू लागलं. अखेर आईनं त्या मुलाला पकडले आणि मैदानाच्या बाहेर नेले.
We hope this mother and her young pitch invader are having a great day. 😂 pic.twitter.com/hKfwa6wyWI
— Major League Soccer (@MLS) August 9, 2021
Tokyo Olympics : मेडल नाही पण मनं जिंकणाऱ्या 'या' खेळाडूंना मिळणार 11 लाखांचं बक्षीस
मैदानात उपस्थित असलेल्या एका प्रेक्षकाने या मजेदार घटनेचा व्हिडीओ तयार केला असून तो सध्या व्हायरल झाला आहे. दोन वर्षांच्या मुलाला पकडण्यासाठी आईनं केलेली धावाधाव सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली असून त्यावर नेटीझन्सच्या अनेक प्रतिक्रिया येत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Live video viral