भारतीय वंशाच्या क्रिकेटपटूला व्हायचंय लंडनचा महापौर!

भारतीय वंशाच्या क्रिकेटपटूला व्हायचंय लंडनचा महापौर!

गेल्या निवडणुकीत मोदींच्या नावाचा वापर करणाऱ्या उमेदवाराला पराभूत करून वर्तमान महापौरांनी बाजी मारली होती.

  • Share this:

लंडन, 13 सप्टेंबर : भारतीय वंशाचा क्रिकेटपटू मॉन्टी पानेसरनं अजुनही क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली नाही. इंग्लंडा माजी फिरकीपटू पानेसरला आता लंडनचा महापौर व्हायचं आहे. सध्या तिथं सादीक खान महापौर आहेत. त्यांचा कार्यकाळ संपत आला असून आता पानेसर यासाठी उत्सुक आहे.

पानेसरनं एका रेडिओ चॅनलवर चर्चेवेळी विचारलं की, मी लंडनमध्ये राहतो. मलाही यामध्ये आवड आहे. जर मी निवडणूक लढलो तर मला मत द्याल का?

लंडनच्या महापौरपदाची निवडणूक पुढच्यावर्षी 7 मे 2020 ला होणार आहे. लंडन अॅसेंब्लीची निवडणूक सोबतच होणार आहे. सध्या लंडनच्या महापौरपदी सादीक खान हे आहेत. लोबर पार्टीचे सादीक 2016 मध्ये निवडून आले होते.

पानेसरनं अजुनही क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली नाही. त्यानं पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर उतरण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सध्या फिटनेसवर काम करत आहे. यावेळी मेहनत घेईन. मला आशा आहे की प्रथम श्रेणीच्या काउंटीमध्ये संधी मिळेल असंही त्यानं म्हटलं.

सध्या लंडनमध्ये राहतो. हळू हळू राजकारणात प्रवेश करावा अशी इच्छा आहे. लंडनचा महापौर होण्याची चांगली संधी आहे. लंडनमध्ये प्रायमरी आणि सेकंडरी स्कूलमध्ये क्रिकेट बघायला आवडेल. तसेच इथल्या लोकांची मदत करेन. लोकांची कामं पुर्ण करायला आवडेल असं पानेसरनं यावेळी सांगितलं.

ब्रिटनची राजधानी असलेल्या लंडनच्या महापौरपदी विराजमान होणारे सादीक पहिलेच मुस्लिम ठरले होते. त्यांनी कंझर्वेटीव पक्षाच्या जॅक गोल्डस्मिथ यांना पराभूत केलं होतं. अटीतटीच्या लढतीत सादीक खान यांनी बाजी मारली होती.

2016 मध्ये लंडनच्या महापौरपदाच्या निवडणुकीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा वापर करण्यात आला होता. तिथल्या हिंदू आणि शीख समुदायाला आपल्याकडं वळवण्यासाठी जॅक गोल्डस्मिथ यांनी मोदींच्या नावाचा वापर केला. मात्र, तरीही सादीक यांच्यापुढे गोल्डस्मिथ यांचा निभाव लागला नाही. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा महापौरपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर सादीक खान लंडनचे महापौर झाले होते.

पानेसरनं इंग्लंडकडून 50 कसोटी सामने खेळले असून 167 विकेट घेतल्या आहेत. तर 26 एकदिवसीय सामन्यात 24 विकेट त्याच्या नावावर आहेत. विशेष म्हणजे पानेसरनं 2006 मध्ये भारताविरुद्ध सामना खेळून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं.

केएल राहुल आणि अनुष्काबद्दल युजरनं केली कमेंट, भारताच्या युवा क्रिकेटपटूनं घेतलं फैलावर

VIDEO: दारूच्या अड्ड्यावर छापा टाकणाऱ्या पोलिसालाच महिलांनी केली मारहाण

Published by: Suraj Yadav
First published: September 13, 2019, 5:58 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading