IPL 20109 : 'या' अफगाणी फॅक्टरपुढं बंगळुरूच्या फलंदाजांनी टाकली नांगी

IPL 20109 : 'या' अफगाणी फॅक्टरपुढं बंगळुरूच्या फलंदाजांनी टाकली नांगी

बंगळुरूकडून 232 धावांचा पाठलाग करताना, पार्थिव पटेल वगळता एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही.

  • Share this:

हैदराबाद, 31 मार्च : आपल्या पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत असलेल्या विराटचा मात्र साजेशी कामगिरी आजवर करु शकला नाही. 231 धावांचा डोंगर पार करण्यासाठी बंगळुरूच्या फलंदाजांवर मदार असताना, विराटची सेना एका मागोमाग एक माघारी परतली. याला कारण ठरलं ते अफगाणी गोलंदाज मोहम्मद नाबी. नाबीनं बंगळुरूच्य चार फलंदाजांना तंबुत पाठवले. तर, पार्थिव पटेल वगळता एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही.

231 धावांचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला दुसऱ्याच षटकात धक्का बसला. भुवनेश्वर कुमारनं मोहम्मद नबी नावाचं आपलं अफगाण फॅक्टर उतरवले, आणि बंगळुरूचा सलामीवीर पार्थिव पटेलला मनीष पांडेकरवी झेलबाद केले.

मोहम्मद नबीनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला दुसरा धक्का दिला. नबीनं त्याच्या दुसऱ्या षटकात शिमरोन हेटमायरला बाद केले. तर, चौथ्या षटकात मोहम्मद नबीनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला दोन धक्के दिले. शिमरोन हेटमायर पाठोपाठ नबीने बंगळुरूच्या एबी डिव्हिलियर्सलाही माघारी पाठवले. नबीनं या सामन्यात 4 ओव्हरमध्ये 4 विकेट घेत, 2.75च्या सरासरीनं केवळ 11 धावा दिल्या.

मलायका - अर्जुनच्या नात्यावर काय म्हणाला अरबाज?

First Published: Mar 31, 2019 06:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading