मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /विराटला एकट्याला मालिकावीर पुरस्कार देण्यावर गौतम गंभीरचा आक्षेप

विराटला एकट्याला मालिकावीर पुरस्कार देण्यावर गौतम गंभीरचा आक्षेप

विराट कोहलीने श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यात दोन शतके केली. तो मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाजही ठरला आहे.

विराट कोहलीने श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यात दोन शतके केली. तो मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाजही ठरला आहे.

विराट कोहलीने श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यात दोन शतके केली. तो मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाजही ठरला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 16 जानेवारी : भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारताच्या विजयानंतर विराट कोहलीला एकट्याला मालिकावीर पुरस्कार देण्यावर आक्षेप घेतला आहे. विराट कोहलीने श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यात दोन शतके केली. तो मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाजही ठरला आहे. दरम्यान, गौतम गंभीरने मालिकावीर पुरस्कार मोहम्मद सिराजसोबत संयुक्तपणे द्यायला हवा होता असं म्हटलं. सिराजने मालिकेत एकूण ९ विकेट घेतल्या. गंभीरने म्हटलं की, तुम्ही नेहमीच फलंदाजांना मालिकावीर पुरस्कार देता पण मोहम्मद सिराज असामान्य असा होता.

गंभीर म्हणाला की, मोहम्मद सिराज विराटच्या बरोबरीने होता. त्याला संयुक्त मालिकावीर पुरस्कार द्यायला हवा होता. तो असामान्य होता आणि फलंदाजीला पोषक खेळपट्टीवर त्याने विकेट घेतल्या. तुम्ही फलंदाजांना मालिकावीर पुरस्कार देण्यासाठी उत्सुक असता पण मोहम्मद सिराज असामान्य असा होता. प्रत्येक खेळात तो दिशा देण्यात सक्षम राहिला. तो भविष्यातील खेळाडू असून प्रत्येक मालिकेनंतर तो आणखी चांगला होत चाललाय.

हेही वाचा : हे काय होतं? श्रेयस अय्यरच्या गोलंदाजीने विराट झाला अवाक्, रिएक्शन व्हायरल

पहिला सामना गुवाहाटीत झाला होता, त्यात सिराजने दोन विकेट घेतल्या होत्या. तर दुसऱ्या सामन्यात सिराजने तीन गडी बाद केले होते. त्यानतंर तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात सिराजने चार गडी बाद केले. एकूण मालिकेत ९ विकेट घेताना त्याचा इकॉनॉमी रेट जवळपास ४ इतका होता.

हेही वाचा : सिराजला 5 विकेट मिळाव्या म्हणून रोहित शर्माची धडपड; पाहा काय काय केलं?

भारताने तिसऱ्या सामन्यात ३९० धावांचा डोंगर उभा केला होता. यात विराट कोहलीच्या दीडशतकाचा तर शुभमन गिलच्या शतकाचा समावेश होता. भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ ७३ धावांवर बाद झाला. फक्त तिघांनाच दुहेरी धावसंख्या गाठता आली. भारताचा गोलंदाज मोहम्मद सिराजने चार तर कुलदीप यादव आणि मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.

First published:
top videos