अमेरिकेनं नाकारला शमीचा व्हिसा, BCCIनं उचललं 'हे' पाऊल

अमेरिकेनं नाकारला शमीचा व्हिसा, BCCIनं उचललं 'हे' पाऊल

भारत-वेस्ट इंडिज यांच्यात होणारे 2 टी-20 सामने अमेरिकेतील फ्लोरिडा या शहरात होणार आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 27 जुलै : आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये हॅट्रिक घेणारा भारताचा जलद गोलंदाज मोहम्मद शमी चांगल्या फॉर्ममध्ये आहे. मात्र शमीचे वैयक्तिक आयुष्य खडतर सुरु आहे. पत्नी आणि त्यांच्यात असलेले वाद कोर्टात पोहचले आहेत. मात्र, या सगळ्या वादामुळं अमेरिकेने शमीचा व्हिसा नाकारला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, शमीचे पडताळणी झाली नसल्यामुळं हा व्हिसा नाकारण्यात आला होता. त्यामुळं या सगळ्या प्रकरणात आता बीसीसीआयला उतरावे लागले आहे. बीसीसीआयचे संचालक राहुल जोहरी यांनी मध्यस्थी करत, शमीला व्हिसा मिळवण्यात मदत केली.

वर्ल्ड कपनंतर भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर रवाना होत आहे. 3 ऑगस्टपासून या दौऱ्याला सुरुवात होत आहे. या 15 खेळाडूंच्या संघात शमीला स्थान मिळाले आहे. दरम्यान सुरुवातीचे दोन टी-20 सामने अमेरिकेतील फ्लोरिडा या शहरात होणार आहेत. त्यामुळं सर्व खेळाडूंनी व्हिसासाठी अर्ज केला होता. यात मोहम्मद शमीचा व्हिसा नाकारण्यात आला होता. मात्र बीसीसीआयनं पत्रव्यवहार करत शमीला व्हिसा मिळवून दिला.

वाचा-अनुष्का शर्माचा हिटमॅनवर पलटवार, रोहित-विराट वाद चिघळला!

पी-1 व्हिसासाठी केले होता शमीनं अर्ज

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघ लवकरच रवाना होणार आहे. मात्र पहिले दोन टी-20 सामने अमेरिकेत होणार आहे. यासाठी बीसीसीआयनं स्टाफ आणि खेळाडूंनी पी-1 व्हिसाकरिता अर्ज केला होता. शमीला टी-20 संघात स्थान मिळालेले नाही, मात्र तरीही संघासोबत तो असणार आहे. शमीची पोलीस पडताळणी झाली नसल्यामुळं त्याचा व्हिसा नाकारण्यात आला होता.

वाचा- निवृत्तीनंतर मलिंगा सोडणार श्रीलंका, धरणार 'या' देशाची वाट

असा आहे वेस्ट इंडिजचा दौरा

वेस्ट इंडिज दौऱ्यात भारत तीन टी 20, तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. या दौऱ्याची सुरुवात टी 20 मालिकेपासून होणार आहे. त्यानंतर एकदिवसीय मालिका 8 ऑगस्ट तर कसोटी मालिका 22 ऑगस्टला सुरू होणार आहे.

वाचा- टेस्ट वर्ल्ड कपच्या रणसंग्रामाला 1 ऑगस्टपासून सुरुवात, असे आहेत नियम

'त्या' 7 प्रवाशांच्या रेस्क्यू ऑपरेशनचा थरार, पाहा LIVE VIDEO

First published: July 27, 2019, 12:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading